Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

Shreya Maskar

गागरोन किल्ला

गागरोन किल्ला राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात आहे. गागरोन किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.

Fort | google

जलदुर्ग

गागरोन किल्ला हा एक अद्वितीय जलदुर्ग असून, तो आहू आणि काळी सिंध या दोन नद्यांच्या संगमावर बांधला गेला आहे. गागरोन किल्ला तीन बाजूंनी नद्यांनी आणि चवथ्या बाजूला खोल खंदकाने वेढलेला असल्याने याला जलदुर्ग मानले जाते.

Fort | google

वैशिष्ट्ये

गागरोन किल्ला विंध्य पर्वतरांगांमधील एका मोठ्या खडकावर, थेट पायाभरणीशिवाय बांधला गेला आहे. राजपूत स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

Fort | google

बांधकाम

गागरोन किल्ल्याचे बांधकाम 7 व्या शतकात सुरू होऊन 12-14 व्या शतकात पूर्ण झाले.

Fort | google

इतिहास

गागरोन किल्ल्यावर प्रामुख्याने गागरोनची लढाई (१५१९) झाली. ज्यामध्ये मेवाडचे राणा सांगा यांनी माळव्याचे सुलतान महमूद खिलजी दुसऱ्याचा पराभव केला. ही लढाई राणा सांगा यांच्या विजयामुळे प्रसिद्ध असून, यात महमूद खिलजीला कैद करण्यात आले होते.

Fort | google

किल्ल्याचा परिसर

गागरोन किल्ल्याच्या परिसरात गणेश मंदिर, शिव मंदिर, आणि सूफी संत मिट्ठे शाह यांची दर्गा असल्याचे, बोले जाते.

Fort | google

कधी जायचे?

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात गागरोन किल्ल्याला नक्की भेट द्या. गागरोन किल्ला राजपूत शौर्य आणि अद्भुत स्थापत्य कलेचे प्रतीक आहे.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : मन उधाण वाऱ्याचे...; पक्ष्यांचा किलबिलाट अन् सूर्यास्ताचे देखणे रूप, अलिबागजवळ लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा

Alibaug Tourism | yandex
येथे क्लिक करा...