Alibaug Tourism : मन उधाण वाऱ्याचे...; पक्ष्यांचा किलबिलाट अन् सूर्यास्ताचे देखणे रूप, अलिबागजवळ लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा

Shreya Maskar

रायगड

किहिम बीच हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील एक शांत, निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे. अलिबागला गेल्यावर येथे फिरायला नक्की जा.

Alibaug | yandex

अलिबाग

अलिबागजवळ प्रसिद्ध किहिम बीच वसलेला आहे. कोकणातील एक शांत, निवांत आणि नारळ-सुपारीच्या झाडांनी वेढलेला निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे.

Alibaug | yandex

वीकेंड डेस्टिनेशन

किहिम बीच मुंबई-पुण्यापासून जवळ असल्याने हे लोकप्रिय वीकेंड डेस्टिनेशन आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Alibaug | yandex

जलक्रीडा

किहिम बीचवर जलक्रीडांचा थरार अनुभवता येतो. उदा. बनाना राइड, जेट स्की, बंपर राईड आणि बोटिंग करू शकता. मित्र मंडळींसोबत येथे नक्की जा.

Alibaug | yandex

पक्षी निरीक्षण

किहिम बीच पक्षी निरीक्षणासाठी बेस्ट आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी विविध प्रकारचे दुर्मिळ पक्षी आणि फुलपाखरे येथे पाहायला मिळतात.

Alibaug | yandex

सूर्यास्त

किहिम बीच सूर्यास्त पाहण्यासाठी सुंदर ठिकाण आहे. संध्याकाळी निवांत फेरफटका मारण्यासाठी येथे नक्की जा. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तुम्ही येथे नक्की जा.

Alibaug | yandex

पर्यटन स्थळे

किहिमपासून जवळ कनकेश्वर मंदिर, कोलाबा किल्ला, मांडवा बीच आणि अलिबाग बीच ही पर्यटन स्थळे आहेत. परदेशी पर्यटकही येथे आवर्जून येतात.

Alibaug | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Alibaug | yandex

NEXT : पालघर लोकल पकडा अन् 'या' ऐतिहासिक ठिकाणी जा, किल्ल्यावरून दिसतो अथांग समुद्र

Palghar Tourism | google
येथे क्लिक करा...