Shreya Maskar
मुंबई जवळ अनेक सुंदर फिरण्याची ठिकाणे आहेत. नेहमी हिल्स स्टेशनला जाण्यापेक्षा कधीतरी आपल्या ऐतिहासिक ठिकाणे पाहायला नक्की जा. येथील सौंदर्य तुमच्या मनात कायम राहील.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मनोरजवळ अशेरीगड आहे. अशेरीगड सुमारे 800 वर्षांहून अधिक जुना आहे. हा इतिहासातील महत्त्वाचा किल्ला आहे.
अशेरीगड शिलाहार घराण्यातील भोजराजाने बांधलेला हा किल्ला पुढे पोर्तुगीज, मराठा आणि ब्रिटिश अशा विविध सत्ताधीशांच्या ताब्यात राहिला आहे.
अशेरीगड हा ऐतिहासिक गिरीदुर्ग (डोंगरी किल्ला)आहे. अशेरीगड समुद्रसपाटीपासून १६४४ फूट उंचीवर किल्ला आहे.
अशेरीगडला जाण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मनोरजवळील खोडकोना गावापासून ट्रेक सुरू होतो. ट्रेक मध्यम ते कठीण स्वरूपाचा आहे. वन डे ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.
पावसाळा आणि हिवाळ्यात येथे नक्की भेट द्या. वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. तुम्हाला प्रवासात निसर्गाचे सुंदर नजारे पाहायला मिळतील.
अशेरीगड किल्ल्यावर गुहा मंदिर, २० पाण्याची टाके, तटबंदी आणि पालघरच्या डोंगररांगांचे दृश्य पाहण्यासारखे आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.