Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Shreya Maskar

वीकेंड प्लान

तुम्हाला वीकेंडला जवळच ट्रिप प्लान करायची असेल तर आदई धबधबा बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्ही वन डे ट्रिप नक्कीच प्लान करू शकता.

Waterfall | google

आदई धबधबा

आदई धबधबा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळ आहे. आदई धबधबा नवीन पनवेल परिसरातील 'आदई' गावात आहे.

Waterfall | google

कसे जाल?

पनवेल रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने येथे जाऊ शकता. पावसाळ्यातील आणि हिवाळ्यात वीकेंडला येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Waterfall | google

जंगल ट्रेक

आदई धबधब्यापर्यंत १०-१५ मिनिटांचा जंगलातून ट्रेक करावा लागतो. येथे निसर्ग सौंदर्यांचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. पर्यटक येथे खास फोटोशूटसाठी येतात.

Waterfall | google

निसर्ग सौंदर्य

आदई धबधबा हे वीकेंड गेटवेसाठी बेस्ट लोकेशन आहे. आदई धबधब्यावर गेल्या‌वर उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा पाहायला मिळतो. जे पाहून तुमचा सर्व ताण कमी होईल.

Waterfall | google

वन डे ट्रिप

तुम्ही येथे फॅमिली, मित्रमंडळी आणि जोडीदारासोबत ट्रिप प्लान करा. येथील आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ पाहायला मिळतो.

Waterfall | google

पनवेल स्पॉट

पनवेलमध्ये अजून खूप सुंदर पिकनिक स्पॉट आहेत. ज्यात कर्नाळा पक्षी अभयारण्य, कर्नाळा किल्ला, कलावंतीण दुर्ग, प्रबळगड आणि आदई धबधबा यांचा समावेश आहे.

Waterfall | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Waterfall | yandex

NEXT : नगरमध्ये निसर्गाच्या कुशीत लपलाय भव्य किल्ला; इतिहास वाचून अभिमान वाटेल, एकदा जाऊनच या

Ahilyanagar Tourism | google
येथे क्लिक करा...