Shreya Maskar
पेमगिरी किल्ला हा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बाळेश्वर डोंगररांगेत वसलेला एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ऐतिहासिक ठिकाण खूप कमी लोकांना माहित आहे.
शहाजीराजे भोसले यांनी निजामशाही वाचवण्यासाठी संगमनेर जवळील पेमगिरी किल्ल्यावरून अंदाजे १६३३ ते १६३६ या काळात ३ वर्षे स्वतंत्र राज्यकारभार चालवला.
पेमगिरी किल्ल्याला शाहगड असे ही म्हणतात. पेमगिरी किल्ला शहाजी राजांनी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या प्रयत्नांचा साक्षीदार मानला जातो.
पेमगिरी किल्ला संगमनेर-अकोले रस्त्यावरील कळस गावाजवळ असून, येथे प्राचीन पेमादेवी मंदिर आणि एक विशाल वटवृक्ष प्रसिद्ध आहे.
पेमगिरी किल्ल्यावर पडक्या तटबंदीचे अवशेष, चोर दरवाजा आणि पाण्याची कोरडे टाकी पाहायला मिळते. इतिहासात या किल्ल्याला मोठे महत्त्व आहे.
पेमगिरी किल्ला यादवकालीन मानला जातो. पेमगिरी किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे. सुट्टीमध्ये येथे फिरायला नक्की जा.
पेमगिरी छोटा डोंगरी किल्ला आहे. किल्ल्यावरून अहिल्यानगरचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.