बिग बॉसचा सातवा आठवडा सुरू आहे.
घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आहे.
एकूण चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
बिग बॉसच्या घरात 'नॉमिनेशनचा लगाम' हा टास्क पार पडला. यात सदस्यांच्या गळ्यात एकमेकांच्या फोटोंच्या पाट्या दिसतात. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे. त्याची पाटी गळ्यातून काढून टाकावी लागते. राकेशने रोशनला नॉमिनेट केले, रुचिताने राकेशला नॉमिनेट केले, राखी सावंतने प्राजक्ताला सुरक्षित करून स्वतः नॉमिनेट झाली. शेवटी तन्वीने प्राजक्ताला नॉमिनेट केले.
बिग बॉसच्या घरातून सातव्या आठवड्यात एकूण चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात प्राजक्ता शुक्रे, राकेश बापट, राखी सावंत आणि रोशन भजनकर यांचा समावेश आहे. या आठवड्यात तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कारण प्रेक्षकांचे आवडते कलाकार नॉमिनेट झाले आहेत. यात प्रामुख्याने दोन नावांची चर्चा पाहायला मिळत आहे. पहिले नाव म्हणजे राखी सावंत आणि दुसरे प्राजक्ता शुक्रे होय. राखी ही बिग बॉसच्या घरात पाहुणी कलाकार म्हणून आली होती. तिने दोन आठवडे घरात राडा घातला आहे. त्यामुळे ती या आठवड्यात बाहेर जाऊ शकते.
सागरच्या गळ्यात दिपालीचा फोटो
रुचिताच्या गळ्यात राकेशचा फोटो
विशालच्या गळ्यात सागरचा फोटो
राखीच्या गळ्यात प्राजक्ताचा फोटो
रोशनच्या गळ्यात राखीचा फोटो
दिपालीच्या गळ्यात रुचिताचा फोटो
प्राजक्ताच्या गळ्यात विशालचा फोटो
राकेशच्या गळ्यात रोशनचा फोटो
येणारा भाऊचा धक्का खूपच खास असणार आहे. रितेश भाऊ कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. घरात आता राखी-राकेश, दिपाली-अनुश्री, प्रभू-प्राजक्ता, विशाल-रुचिता यांच्यात भांडणे पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.