Bigg Boss Marathi 6 : रितेश भाऊंनी घेतली राखी सावंतची बाजू; सचिनला सुनावले खडेबोले, नेटकरी भडकले|VIDEO
'बिग बॉस मराठी 6' मध्ये या आठवड्यात राखी सावंत प्राजक्ताशी भांडताना दिसली.
प्राजक्तावरून राखी आणि सचिनचे भांडण झाले.
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सचिन कुमावतवर भडकला.
'बिग बॉस मराठी 6' ची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. राखी सावंत आल्यापासून घरात रोज नवीन राडा होताना दिसत आहे. ती घरातीस सदस्यांना त्रास देते. गेल्या काही दिवसांत प्राजक्ता शुक्रे आणि राखी सावंत यांच्यात जोरदार भांडण झाले होते. प्राजक्ता घरातील काम करण्यास नकार देते, ज्यामुळे राखी चांगलीच भडकते आणि रागाच्या भरात प्राजक्तावर पीठ फेकते. हे पाहून घरातील सर्व सदस्य राखीवर भडकतात.
सचिन कुमावत राखीच्या या कृतीमुळे तिच्यावर चांगला भडकतो. त्याचा संयम सुटतो. तो राखीच्या तोंडावर पाणी फेकतो आणि त्यानंतर पीठही फेकतो. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सचिनला त्याच्या या कृतीचा जाब विचार आहे. भाऊच्या धक्क्याचा धमाकेदार प्रोमो समोर आला आहे. यात रितेश भाऊ राखीची बाजू घेताना आणि सचिनला ओरडताना दिसत आहे. ज्यामुळे प्रेक्षक चांगलेच संतापले आहे. रितशे भाऊ राखीच्या चुकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोले जात आहे. कारण भांडणाची सुरूवात राखीने केली असते.
रितेश भाऊ नेमकं काय म्हणाले?
रितेश भाऊ - सचिन तुम्ही राखी यांच्या तोंडावर पाणी फेकलं, पीठ पण टाकलं... हे तुमचे नॅशनल रिॲक्शन होते...
सचिन कुमावत - ठरलेले नव्हते भाऊ...
रितेश भाऊ - तुम्ही एका महिलेच्या चेहऱ्यावरती पाणी कसे फेकू शकता? तुम्ही इथे सचिन भाऊ म्हणून वावरता ना? मग काय तुमचा आदर राहणार आहे? मला हे खूप खटकले...
बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी या आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. पाहा यादी-
सचिन कुमावत
प्रभू शेळके
प्राजक्ता शुक्रे
दीपाली सय्यद
रुचिता जामदार
राकेश बापट
अनुश्री माने
रोशन भजनकर
सागर कारंडे
भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख अजून कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच या आठवड्यात कोण बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
