Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam : ऑनलाइन भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय...' सिनेमा ओटीटीवर येणार, कुठे अन् कधी पाहाल?

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam OTT : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट आता ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. सध्या चित्रपट थिएटरमध्ये गाजत आहे.
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam OTT
Krantijyoti Vidyalay Marathi MadhyamSAAM TV
Published On
Summary

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट 1 जानेवारी 2026ला प्रदर्शित झाला.

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट हेमंत ढोमे दिग्दर्शित आहे.

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट आता ओटीटीवर येत आहे.

सध्या सर्वत्र मराठी भाषेचा डंका पाहायला मिळत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट तुफान गाजत आहे. आता चित्रपट रिलीज होऊन दोन महिने झाले आहेत. 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट 1 जानेवारी 2026ला प्रदर्शित झाला. चित्रपटात मराठी शाळा आणि मराठी भाषेबद्दलचे मत, विचार मांडले आहेत. ज्यामुळे चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले आहे. आता 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. ओटीटी अपडेट जाणून घेऊयात.

ओटीटी रिलीज

नुकतीच सोशल मिडिया पोस्ट समोर आली आहे. ज्यात चित्रपटाचे ओटीटी अपडेट समोर आले आहेत. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' चित्रपट ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. चित्रपटाचे ऑनलाइन स्ट्रीमिंग राइट्स ZEE 5 ने विकत घेतले आहेत. आता तुम्ही घरबसल्या शाळेच्या आठवणी ताज्या करू शकता. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' चित्रपट 27 फ्रेबुवारीला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी केले आहे. लवकरच 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम'चा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा हेमंत आणि क्षितीने केली. चाहते आता 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट घरबसल्या पाहायला खूप उत्सुक आहेत. आता ओटीटीवर मराठी शाळा भरणार आहे.

चित्रपटातील कलाकार

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, कादंबरी कदम, क्षिती जोग, निर्मिती सावंत आणि प्राजक्ता कोळी हे झळकले आहेत.

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam OTT
The 50 Winner : 'द ५०'च्या ट्रॉफीवर शिव ठाकरेनं कोरलं नाव? सोशल मीडियावर महाराष्ट्राच्या लेकाचं होतंय कौतुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com