Shreya Maskar
'मर्दानी 3' सिनेमा 30 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'मर्दानी 3'मधून पुन्हा एकदा राणी मुखर्जी पोलीसांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'मर्दानी 3' हा 'मर्दानी' फ्रँचायझीचा सीक्वल आहे. आतापर्यंत 'मर्दानी' सिनेमाचे दोन भाग झाले आहेत. 'मर्दानी'च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
'मर्दानी' चित्रपट 22 ऑगस्ट 2014 ला रिलीज झाला. तर 'मर्दानी 2' सिनेमा 13 डिसेंबर 2019 ला प्रदर्शित झाला आहे आणि आता सात वर्षांनी पुन्हा 'मर्दानी 3'प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'मर्दानी 3' चित्रपटाचे बजेट जवळपास 60 कोटी रुपये आहे. राणी मुखर्जी चित्रपटात पोलिस शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसत आहे.
'मर्दानी 3'हा ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपट आहे. कोणताही मागमूस न ठेवता बेपत्ता होणाऱ्या मुलींना वाचवण्यासाठी शिवानी शिवाजी रॉय परत आली आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'मर्दानी 3' चित्रपटाने दोन दिवसांत 10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'मर्दानी 3' ने जगभरात सुमारे 14.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, राणी मुखर्जीचा 'मर्दानी 3' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे ओटीटी रिलीज राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'मर्दानी 3' चित्रपट 27 मार्च 2026 पर्यंत ओटीटीवर पाहायला मिळेल किंवा रिलीज होईल. मात्र अद्याप 'मर्दानी 3' ची रिलीज डेट अधिकृतरित्या जाहीर झाली नाही.