
राज्यातील थंडी काही दिवसांपूर्वी गायब झाली होती. पण आता पुन्हा तापमानात घट झाली असून थंडी वाढायला सुरूवात झाली आहे. सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील नागरिक थंडीचा अनुभव घेत आहेत. उत्तर भारतामध्ये थंडी प्रचंड वाढली आहे. देशातील उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये गारठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालचा उपसागर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा सध्या तमिळनाडूच्या दिशेनं पुढे सरकत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे ६ दिवस दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही पण पुढच्या ५ दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे.
महाराष्ट्रात सध्या दिवसा ३ ते ५ डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ राहण्याची शक्यता आहे. तर रात्री ३ ते ५ डिग्रीने तापमान घसरण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात किमान तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे. तर राज्यातील इतर ठिकाणीही हळूहळू तापमान घसरण्याची शक्यता आहे. तापमानात घट होऊन थंडी वाढल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाचे म्हणजे, उत्तर महाराष्ट्रात थंडी प्रचंड वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. पुढील ५ दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. सध्या जळगावमध्ये किमान तापमान ८.६ अंशांवर पोहचले आहे. पुढच्या काही दिवसांत या तापमानात देखील घट होईल. तापमानात कमालीची घट झाल्यामुळे सध्या राज्यातील नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.Mumbai
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.