Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात 'इतके' वर्ष रहिवाशी असलेल्या महिलांनाच मिळेल लाडकी बहीण योजनेचा लाभ,जाणून घ्या नियम

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे. पण किती वर्ष अधिवास असणं आवश्यक आहे, हे जाणून घेऊ.
Ladki Bahin Yojana Rule
Ladki Bahin YojanaHT
Published On

महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर अनेक निर्णय घेतले आणि अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. या योजनेतील एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेतून साधरण दोन कोटी लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य मिळाले आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेसंदर्भातील नियम माहिती करून घेणं आवश्यक आहे.

महिलांना केंद्रस्थानी ठेवून ही योजना सुरू करण्यात आलीय. या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. आता यात वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झालीय. या योजनेचा नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता महिलांना मिळाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार,डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील अशी शक्यता आहे.

महायुती सरकार लवकरच या योजनेतून मिळणारी रक्कम वाढवणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी हे आश्वसने दिले होते. आता हे पैसे कधी वाढवून मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याचदरम्यान योजनेसंदर्भातील निकष हे कठीण करण्यात आलेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल सर्व निकषात पात्र होणं आवश्यक आहे.

यातील एक नियम म्हणजे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे. पण योजनेच्या लाभासाठी राज्यात किती दिवसापासून रहिवाशीत्व असणं आवश्यक आहे? असा सवाल अनेकांकडून केला जात आहे.

Ladki Bahin Yojana Rule
Ladki Bahin Yojana : जालन्यातील ७ हजार लाडक्या बहिणींना ७५०० मिळालेच नाहीत, पुन्हा अर्ज करता येणार?

लाडकी बहीण योजनेच्या अटी काय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ आणि केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांना दिला जातो. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना मिळतो. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो.

Ladki Bahin Yojana Rule
Ladki Bahin Yojana: पिंपरी चिंचवडमध्ये ४२ हजार लाडक्या बहिणी लाभापासून वंचित, आता पैसे मिळणार का?

या योजनेचा लाभ परराज्यात जन्म झालेल्या परंतु महाराष्ट्रात रहिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केलेल्या महिलांना सुद्धा मिळतो. अशावेळी महिलेच्या पतीचे डॉक्युमेंट्स योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जातात.

लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे आधिवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. लाभार्थी महिलेकडे जर आधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी १५ वर्षांपूर्वी रेशन कार्ड असलं पाहिजे. याचाच अर्थ योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ वर्ष महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com