Ladki Bahin Yojana: पिंपरी चिंचवडमध्ये ४२ हजार लाडक्या बहिणी लाभापासून वंचित, आता पैसे मिळणार का?

Pimpari Chinchwad News: एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ४२ हजार ४८६ महिला या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळावे याची आशा लागली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत महिलांना ५ हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. ते सहाव्या हप्त्याच्या पैशाची वाट पाहत आहेत. राज्य सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक महिलांना मिळायला हवा होता. मात्र एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ४२ हजार ४८६ महिला या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ४ लाख ३२ हजार ८९० महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र या ४ लाख ३२ हजार ८९० अर्जांपैकी जवळपास ४२ हजार ४८६ महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापित झालेलं महायुती सरकार पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या लाडक्या बहिणांना योजनेचा लाभ मिळवून देणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

Ladki Bahin Yojana
Maharashtra Politics: विरोधी पक्षातील आमदारांचा शपथविधीवर बहिष्कार, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक

अपुरी कागदपत्र असणे, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणं, एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज करणे, अशा काही कारणांमुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत. या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा अशी अपेक्षा आहे. सरकारने आम्हाला देखील या योजनेमध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणी या महिलांकडून केली जात आहे.

Ladki Bahin Yojana
lek Ladki Yojana: महिलासह मुली होणार लखपती, 'या' योजनेत मिळतात लाखो रूपये

दरम्यान, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना आतापर्यंत ५ हफ्त्याचे पैसे मिळाले आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या ५ महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या बॅक खात्यामध्ये जमा झाले आहेत. डिसेंबर महिन्याचे म्हणजे सहाव्या हफ्त्याचे पैसे त्यांना मिळाले नाही.

आता या सहाव्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न या लाडक्या बहिणींना पडला आहे. महत्वाचे म्हणजे महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्नासन देखील देण्यात आले होते. त्यामुळे या योजनेअंतर्गत २१०० रुपयांचा हफ्ता कधी मिळणार याची वाट राज्यातील लाडक्या बहिणी पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीला डिसेंबरलाच 2100 की 1500 मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com