
Weather Updates News in Marathi :अवकाळी पावसाने उघडीप देताच राज्यातील आकाश निरभ्र होऊ लागलेय. कमाल आणि किमान तापमानातही मोठ्या प्रमाणात घट पाहायाला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा वाढलाय. त्यामुळे गावागावात आणि शहरात पुन्हा एकदा शेकोट्या पेटवल्या जात आहेत. कपाटातून गरम कपडे बाहेर काढण्यात आली आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
खान्देश, नाशिकपासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील 10 दिवस थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार 10 डिसेंबरनंतर जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तरेकडील थंडी वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढू लागलाय. उत्तर महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली असून पारा १० अशांच्या खाली घसरला आहे. आज राज्याचा तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि कोकण वगळता उर्वरित राज्यात आणखी कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता आहे. धुळ्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. धुळे कृषी महाविद्यालयात ९.५ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. जळगावाचा पारही १० अंशापर्यंत घसरलाय. रविवारी जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३४.५ अंश तापमानाची नोंद झाली.
फेंजल चक्रीवादळामुळे राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे. महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आज (ता. ९) आकाश निरभ्र राहण्यासह किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होत थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सांताक्रूझ येथे १७.२ अंश, तर कुलाबा येथे २०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत थंडी परतल्याचे दिसत आहे. मुंबईत पारा १६ अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र होणार ठळक -
विषुववृत्तीय हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. ७) कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. आज (ता. ९) ही प्रणाली ठळक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारपर्यंत (ता. ११) ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.