Mumbai Bus Accident : BEST चा वाईट काळ! ८ महिने, १४ ठिकाणं, वेळ रात्रीचीच; अपघातांत २० जणांचा बळी

mumbai best bus accident : मुंबईतील विविध भागात आतापर्यंत अनेकदा बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गेल्या ८ महिन्यात झालेल्या अपघातात २० जणांनी जीव गमावलाय.
BEST चा वाईट काळ! ८ महिने, १४ ठिकाणं, वेळ रात्रीचीच; अपघातांत २० जणांचा बळी
Mumbai Bus Accident Saam tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही

मुंबई : कुर्ला येथील भीषण अपघाताच्या घटनेने शहर हादरून गेलं आहे. कुर्ला येथील बुद्ध कॉलनी येथे झालेल्या अपघातात ६ जणांनी जीव गमावला. सातत्याने घडणाऱ्या अपघाताच्या भयानक घटनेने सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या ८ महिन्यात बेस्टच्या धडकेत २० जणांनी जीव गमावले आहेत. बेस्टच्या धडकेने झालेल्या अपघात २० जणांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईत रात्रीच्या सुमारास सातत्याने घडणाऱ्या अपघाताच्या घटनेनंतर बेस्ट प्रशासनाला जाग आली आहे.

कुर्ल्यातील बुद्ध कॉलनीत झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानंतर संपूर्ण मुंबई शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या ८ महिन्यात सातत्याने बेस्ट बसच्या अपघातामुळे मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. या बेस्ट बसच्या अपघातामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यानंतर कुर्ला दुर्घटननंतर प्रशासनाला जाग आली आहे.

कुर्ला येथील अपघातांसहित इतर बेस्ट बसच्या अपघाती मृत्यूंची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मागील १७ एप्रिल २०२४ ते ९ डिसेंबरपर्यंत २०२४ पर्यंत २० जणांनी बेस्टच्या धडकेत प्राण गमावले आहेत.

BEST चा वाईट काळ! ८ महिने, १४ ठिकाणं, वेळ रात्रीचीच; अपघातांत २० जणांचा बळी
Kurla BEST Bus Accident : अनुभव नसताना बस चालवली? नेमणूक करणाऱ्यांची चौकशी होणार

या काळात मुंबईतील १४ ठिकाणी अपघाताची घटना घडली आहे. या १४ ठिकाणी झालेल्या अपघातात २० जणांनी जीव गमावले. १७ एप्रिल रोजी एका ६० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा प्रिसेंस स्ट्रीट या भागात अपघाताची घटना घडली होती. त्यानंतर २७ एप्रिल रोजी एका ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा देवीडापाडा सिद्धिविनायक नर्सिंग होम या ठिकाणी मृत्यू झाला होता. ५ मे रोजी ५९ वर्षीय सतीश दिनकर चव्हाण या व्यक्तीचा रबाळे स्टेशनवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. ९ मे रोजी ८० वर्षीय कुसूम पाटील यांचा प्रभादेवी येथे अपघाती मृत्यू झाला होता. २२ मे रोजी अनिल शिंदे यांचा व्ही. एन. चौक येथे अपघात झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

BEST चा वाईट काळ! ८ महिने, १४ ठिकाणं, वेळ रात्रीचीच; अपघातांत २० जणांचा बळी
Kurla Bus Accident: बेस्ट प्रशासनाकडून प्रकरण दाबलं जातंय का? पाहा VIDEO

५ जून रोजी झालेल्या अपघातात ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा विलेपार्ले स्टेशनजवळ अपघात झाला होता. ११ जून रोजी ३० वर्षीय तरुणाचा माहीम बस स्टेशन गेटजवळ अपघाती मृत्यू झाला होता. २५ जून रोजी गोराई भागात झालेल्या अपघातात ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात आरती धुरी यांचा प्लाझा येथे अपघाती मृत्यू झाला होता. १ सप्टेंबर रोजी गणेश टॉकीज येथे झालेल्या अपघातात २७ वर्षीय नुपुरा मणियारचा मृत्यू झाला होता.

BEST चा वाईट काळ! ८ महिने, १४ ठिकाणं, वेळ रात्रीचीच; अपघातांत २० जणांचा बळी
BEST Bus Accident : दिसेल त्याला चिरडलं, कुर्ल्यातील बस अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

६ सप्टेंबर रोजी झालेल्या पीएमजी कॉलनी येथे झालेल्या अपघातात आलार मोहम्मद अमीन सय्यद यांचा मृत्यू झाला होता. तर २३ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात रुपेश अभंग यांचा दिंडोशी भागात मृत्यू झाला होता. ११ ऑक्टोबर रोजी मुंबई डाइंग येथे झालेल्या अपघातात ४६ वर्षीय ज्ञानेश्वर ढीगे यांचा मृत्यू झाला होता. तर त्यानंतर काल ९ डिसेंबर रोजी कुर्ला बुद्ध कॉलनी येथे झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला.

या अपघातात कनिस अन्सारी (५५ वर्षे), आफरिन शाह (१९ वर्षे), अनम शेख (२० वर्षे)या महिलांचा मृत्यू झाला. शिवम कश्यप(१८ वर्षे, विजय गायकवाड (७० वर्षे) आणि फारूख चौधरी (५४ वर्षे) या पुरूषांचा मृत्यू झालाय. या १४ अपघातांपैकी बहुतांश अपघात रात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com