Mumbai Best Bus Accident : बेफाम बसने ५ जणांना चिरडले, ३१ जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर, चालकाला ठोकल्या बेड्या

kurla Best Bus Accident : सोमवारी रात्री कुर्लामध्ये बेस्ट बसचा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झालाय.
Best Bus Accident Mumbai Kurla
Best Bus Accident Mumbai KurlaBest Bus Accident Mumbai Kurla
Published On

Best Bus Accident Mumbai Kurla : कुर्ल्यामध्ये बेस्ट बस नव्हे तर सोमवारी संध्याकाळी बसच्या रूपाने यमदूतच आला होता. एरवी सामान्यांना घेऊन जाणारी बेस्टची बस रस्त्यावर असलेल्या रिक्षा, दुचाकीसह चालणाऱ्याना लोकांना चिरडत गेल्याचे चित्र अनेकांना सुन्न करणारे होते. कुर्ल्यामध्ये सोमवारी रात्री बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोलले जातेय. या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय. तर ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या जीवघेण्या अपघाताने कुर्ला पश्चिम येथील आंबेडकर नगरच्या रस्त्यावर स्मशान शांतता पसरली होती.

आरोपी बेस्ट चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघात कसा घडला याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरु आहे. याशिवाय प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला जाणार आहे. अपघात घडल्यानंतर जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देणे ही प्राथमिकता होती. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया सह पोलीस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी दिली.

Best Bus Accident Mumbai Kurla
Bus Accident: मित्रासोबत चालू होत्या गप्पा, मागून बस आली आणि..., अंगाचा थरकाप उडवणारा अपघाताचा CCTV व्हिडिओ Viral

५ जणांनी जीव गमावला -

कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झालाय. तर जखमी ३१ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 1)विजय विष्णू गायकवाड(७०) 2)आफ्रीन अब्दुल सलीम शहा(१९) 3)अनम शेख(२०) 4)कणीस फातिमा गुलाम कादरी(५५) 5)शिवम कश्यप(१८) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करीत आहे.

Best Bus Accident Mumbai Kurla
Kurla Best Bus Accident : रस्त्यावरून चालायला जागा नाही, लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भीषण अपघातानंतर चाचाने केला आक्रोश

बस चालकाला ठोकल्या बेड्या, गुन्हा दाखल -

सोमवारी रात्री जेव्हा हा अपघात घडला तेव्हा, अपघातग्रस्त बस मध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बस चालक संजय मोरे(५४) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करीत आहे.

Best Bus Accident Mumbai Kurla
Mumbai Best Bus Accident: कुटुंबीय लग्न समारंभात होते अन्...; प्रत्यक्षदर्शींने सांगितला भरधाव बेस्ट बस अपघाताचा थरार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com