Bus Accident
Kurla Bus Accident VideoSaam Tv

Bus Accident: मित्रासोबत चालू होत्या गप्पा, मागून बस आली आणि..., अंगाचा थरकाप उडवणारा अपघाताचा CCTV व्हिडिओ Viral

Kurla Bus Accident Video: अपघाताची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापक पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळतोय.
Published on

मुंबईच्या कुर्ला येथे बेस्ट बसच्या भीषण अपघाताची भयंकर घटना घडली आहे. या भरधाव बेस्ट बसच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत वर्दळीच्या रोडवरील भरधाव बेस्ट बसच्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. या सीसीटीव्हीत अनेकांना चिरडल्याचे दिसत आहे.

कुर्ल्याच्या पश्चिम रेल्वे रोडवरील आंबेडकर नगर येथे ही बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातातील गंभीर जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी एकच संताप व्यक्त केला. या अपघात काहींचे जीव थोडक्यात वाचले. या अपघाताचा थरारक सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.

Bus Accident
Mumbai Best Bus Accident: कुटुंबीय लग्न समारंभात होते अन्...; प्रत्यक्षदर्शींने सांगितला भरधाव बेस्ट बस अपघाताचा थरार

कुर्ल्यात बेस्ट बसने अनेक वाहनं आणि नागरिकांना धडक दिल्याची घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात आतापर्यंत २० जण जखमी झालेत तर तिघांचा मृत्यू झालाय. याची अधिकृत माहिती मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आलीय. भरधाव बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या अनेक नागरिकांना चिरडले आहे. तसेच अनेक वाहनांनादेखील जोराची धडक दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

Bus Accident
Mumbai Best Bus Accident : मुंबईत भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवलं; अपघातात ३ जणांचा मृत्यू

सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय दिसतंय?

एका दुकानासमोर दोघे जण उभे होते. दोघे मोबाईलमध्ये गुंग होते. तेवढ्यात त्यांच्या मागून एक भरधाव बेस्ट बस आली. या बसने काहींना चिरडलं. त्यात मोबाईलमध्ये पाहणाऱ्या एकाला चिरडलं. तर एकजण थोडक्यात बचावला. भरधाव बसला पाहून काही व्यक्ती प्रचंड घाबरले. या बेस्ट बसच्या अपघातानंतर लोकांनी आरडोओरड केली. या भीषण अपघाताचे दोन सीसीटीव्ही समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com