BEST Bus Accident : दिसेल त्याला चिरडलं, कुर्ल्यातील बस अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Kurla Bus Accident CCTV Video News : सोमवारी रात्री कुर्लामध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय. यामध्ये सात जणांचा आतापर्यत मृत्यू झालाय. तर ३० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय.

Kurla Best Bus Accident CCTV Video : कुर्ला बेस्ट बसने सोमवारी रात्री अनेकांना उडवले, वाहनांना चिरड्याची धक्कादायक घटना घडली. मन सुन्न करणाऱ्या या अपघाताचा व्हिडीओ समोर आलाय. या सीसीटीव्हीमध्ये बस भयंकर वेगाने जात असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी बसचा चालक संजय मोरे यास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कुर्ला येथील बेस्ट बस अपघातामध्ये मृताची संख्या ७ वर पोहचल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ३० जण जखमी झाले आहे. पोलिसांकडून चालक संजय मोरे याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानं पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती दिली.

संजय मोरे चालवत असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याची माहिती चौकशीनंतर समोर आली आहे. पण बसचा वेग आपोआप वाढू लागला आणि ब्रेक फेल झाल्याचा दावा संजय मोरे यांनी पोलिसांच्या तपासावेळी केला. मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक हा कंत्राटाद्वारे नेमला आला होता. संजय मोरे हा एक डिसेंबर रोजी कामावर रूजू झाल्याची माहिती समोर आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com