MSP Increased: केंद्र सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; १४ खरीप पिकांच्या हमी भावात वाढ, काय आहेत नवीन दर?

PM Modi Cabinet Approved MSP For kharip Season Crops: केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. १४ खरीप पिकांच्या MSP किमतीत वाढ करण्यात आली आहे.
खरीप पिकांच्या हमी भावात वाढ
MSP IncreasedSaam Tv
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सत्तेत येताच आतापर्यंत दोनवेळा शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये २०२४-२५ साठी १४ खरीप पीकांची एमएमसी वाढवण्यास मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या केंद्रिय मंत्रिमंडळाने काल झालेल्या बैठकीत पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारने १४ खरीप पिकांची एमएसपी वाढवण्यास मंजुरी दिलीय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले (MSP Increased) आहेत. या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शेतकऱ्यांना प्राधान्य देतात. मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी १४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली (MSP For kharip Season Crops) आहे.

खरीपच्या १४ पिकांच्या एमएसपी दराला मंजूरी

शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. खरीपच्या १४ पिकांच्या एमएसपी दराला मंजूरी देण्यात आली आहे. धानाला २३०० रूपये क्विंटल भाव दिला जाणार (PM Modi Cabinet) आहे. धानाच्या किंमतीत १७० रूपयाची वाढ करण्यात आली आहे. कापसाच्या एमएसपीत ५०० रूपयाची वाढ करण्यात आली आहे. आता कापसाचा नवीन दर ७ हजार ५२१ रूपये आणि ७ हजार १२१ रूपये प्रतिक्विंटल असणार आहे.

खरीप पिकांच्या हमी भावात वाढ
Cashew Growers Seek MSP of Rs 200 Per Kg : काजूला हमीभाव द्या, अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

१४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत किती?

ज्वारी ३ हजार ३७१ रूपये, मूग ८ हजार ६८२, मका २ हजार २२५ रूपये, तूर ७ हजार ५५० रूपये, मूग ८ हजार ६८२ रूपये, नाचणी ४ हजार ९० रूपये, उडीद ७ हजार ४०० रूपये, बाजरी २ हजार ६२५ रूपये, सुर्यफूल ७ हजार २८० रूपये, भूईमूग ६ हजार ७८३ रूपये, सोयाबीन ४ हजार ८९२ रूपये प्रतिक्विंटल असा भाव जाहीर करण्यात आला आहे. देशात शेतमालासाठी २ लाख टनाचं स्टोरेज तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती या (PM Modi) मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे.

खरीप पिकांच्या हमी भावात वाढ
Pulses MSP: सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार; उडीद आणि तूर डाळीचा एमएसपी वाढ होण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com