Sangli Municipal Corporation takes strict action as 37 employees are suspended for prolonged unauthorized absence. saam tv
महाराष्ट्र

महापालिकेच्या 37 कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलबंन; प्रशासनात खळबळ

37 Municipal Employees Suspended In Sangli For Long Absence: सांगली महापालिकेने ९० दिवसांहून अधिक काळ गैरहजर राहिलेल्या ३७ कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केले. स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर विभागांवर कारवाई करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली महापालिकेच्या विविध विभागातील तब्बल 37 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कामावर हजर राहत नसल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त संगीता महापत्रा यांनी ही धडक कारवाई केली आहे. सफाई विभागासह पाणीपुरवठा, अग्निशमन, बांधकाम आणि सुरक्षा विभागामधील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ९० दिवसांपेक्षा जास्त काळ विनापरवाना गायब राहिल्याचा ठपका ठेऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा विस्कळीत केल्याबद्दल विभागीय चौकशी सुरू केली आहे. एकाच वेळी 37 कर्मचाऱ्यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सांगली महानगरपालिका क्षेत्रात नागरी सुविधा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा कडक इशारा देत महापालिका आयुक्त श्रीमती महापात्र यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वारिष्ठांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि रजा मंजूर नसताना सलग 90 दिवसांपेक्षा अधिक दिवस गैरहजर राहिल्याने विविध विभागातील 37 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. फक्त निलंबनाच्या कारवाईवरच न थांबता महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार बडतर्फीची कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या चारही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड मुकादम आणि सहाय्यक आयुक्तामार्फत हजेरी मास्टरची कडक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनेक दिवसांपासून गैरहजर असलेले कर्मचारी दोषी आढळून आले.

आरोग्य आणि स्वच्छता विभाग- 28

पाणी पुरवठा विभाग-5

अग्निशमन विभाग, जलनिस्सारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, सुरक्षा विभाग यमधील प्रत्येकी 1 अशा 37 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सफाई कामगार, शिपाई यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT