Kalyan : कल्याणमध्ये खळबळ! अनधिकृत बांधकाम करणारा कुख्यात बिल्डर पोलिसांच्या ताब्यात, दोन वर्षांपासून होता फरार

Kalyan News : दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर अखेर कल्याण गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. घरातील कपाटात लपून बसलेल्या डोलारेला पोलिसांनी अटक केली.
SALMAN DOLARE ARRESTED AFTER TWO YEARS | KALYAN CRIME BRANCH NABS FUGITIVE BUILDER HIDING IN WARDROBE
SALMAN DOLARE ARRESTED AFTER TWO YEARS | KALYAN CRIME BRANCH NABS FUGITIVE BUILDER HIDING IN WARDROBESaam Tv
Published On
Summary
  • कल्याणमध्ये खळबळ

  • दोन वर्षांपासून फरार असलेला बिल्डर पोलिसांच्या ताब्यात

  • कल्याण गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे फ्लॅटवर छापा

  • आरोपी घरातील कपाटात लपून बसलेला आढळला

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या डोलारेला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांची चाहूल लागताच तो घरातील कपाटात लपून बसला होता. मात्र, पोलिसांनी कसून तपास करत त्याला शोधून ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान डोलारे कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरातील खोटाल मंजिल इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर कल्याण गुन्हे शाखा, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाईचे नियोजन केले. कल्याण क्राईम ब्रँच युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित फ्लॅटवर छापा टाकला. फ्लॅटची झडती सुरू असताना सलमान डोलारे घरातील कपाटामध्ये लपून बसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

SALMAN DOLARE ARRESTED AFTER TWO YEARS | KALYAN CRIME BRANCH NABS FUGITIVE BUILDER HIDING IN WARDROBE
Gold Rate Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात ४,६९० रुपयांनी सोनं स्वस्त, वाचा ताजे दर

सलमान डोलारे अटकेत असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी इमारतीबाहेर मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. सलमान डोलारे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कल्याण परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

SALMAN DOLARE ARRESTED AFTER TWO YEARS | KALYAN CRIME BRANCH NABS FUGITIVE BUILDER HIDING IN WARDROBE
Flight Service Closed : प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

आरक्षित भूखंडांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आलेल्या काही प्रकल्पांची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या फाईल्स चोरीला गेल्याची तक्रारही महापालिकेकडून दाखल करण्यात आली असून त्याचाही तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सलमान डोलारेविरोधात बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे अनधिकृत बांधकामे, खोट्या कागदपत्रांचा वापर यासंदर्भातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता संपूर्ण कल्याण परिसराचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com