Sangali Police Saam Tv
महाराष्ट्र

Sangli Crime: पुण्यानंतर सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीसोबत घडलं भयंकर, शेजारी बसून तरुणीसोबत अश्लील कृत्य

Sangali Police: सांगलीमध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाने तरुणीसोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीला पाठलाग करत पोलिसांनी अटक केली.

Priya More

विजय पाटील, सांगली

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीसोबत बलात्काराची घटना घडली होती. या घटनेमुळे पुण्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र हादरला होतात. पुण्यातील ही घटना ताजी असतानाच सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीसमोर अश्लिल कृत्य करणाऱ्या आरोपीला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पुणे ते सांगली असा शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीसोबत ही घटना घडली आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाने तरुणीसोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी संशयित वैभव वसंत कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. दरम्यान मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. बस स्टँडवर आल्यानंतर तरुणीने आरडाओरडा करत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत संशयिताला पकडले आणि चोप देत पोलिस ठाण्यात आणले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका गावात राहणारी तरुणी पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने राहते. पीडित तरुणी परवा स्वारगेट ते सांगली या शिवशाही बसमधून गावी जाण्यासाठी निघाली होती. यावेळी इस्लामपूरजवळ संशयित वैभव कांबळे हा बसमध्ये चढला. तरुणीच्या मागील बाजूला असणाऱ्या सीटवर तो बसला होता. रात्री ११ वाजता आष्ठावरून सांगलीकडे येत असताना संशयित कांबळे हा वारंवार खिडकीजवळून पीडितेला स्पर्श करून अश्लील चाळे करू लागला.

रात्रीची वेळ असल्याने पीडित तरुणी भयभीत झाली होती. साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस सांगली स्थानकात आली असता पीडितीने घडलेला प्रकार चालकासह तेथील पोलिसांना सांगितला. तेवढ्यात संशयित तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

SCROLL FOR NEXT