Sangli Police : बसस्थानकावर चोऱ्या वाढल्या; सांगली पोलिसांनी बसस्थानकावर लावले महिला चोराचे पोस्टर

Sangli News : बसस्थानकात प्रवाशांची गर्दी असते. बसमध्ये चढताना प्रवाशांची होणारी गर्दी पाहून चोरटे हात साफ करतात. महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्स चोरीला जात असल्याच्या घटना घडत असतात
Sangli Police
Sangli PoliceSaam tv
Published On

सांगली : बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत दागिने. रक्कम लांबविली जात असते. सांगली बसस्थानकात अनेक चोरीचे प्रकार घडले आहेत. मात्र चोरी करणारे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या चोरीच्या घटनांमध्ये महिलांचा सहभाग असण्याच्या शक्यतेने सांगली पोलिसांनी बसस्थानक आवारात महिला चोरांचे पोस्टर लागले आहेत. 

बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. तर बसमध्ये चढताना प्रवाशांची होणारी गर्दी पाहून चोरटे हात साफ करत असतात. महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्स, पाकीट चोरीला जात असल्याच्या घटना घडत असतात. सांगली बसस्थानकावर देखील अशा घटना सातत्याने घडत आहेत. दागिने चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आलेल्या आहेत. 

Sangli Police
Nagpur News : अल्पवयीन मुलाच्या प्रेमात बुडाली; फूस लावून मुलाला पळविले, एका पोस्टने पितळ पडले उघडे

बसस्थानकात चार ठिकाणी लावले पोस्टर 

महिलांनी सोने चांदीची सुरू केल्याचे आणि गुन्हे सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिसांनी अनोखी शकल लढवत ज्या रेकॉर्डवरच्या महिला चोर आहेत. त्यांचे पोस्टर सांगली बस स्थानकामध्ये चार ठिकाणी लावण्यात आले आहे. हे पोस्टर लावून या महिलांपासून सावध रहावे; असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.

Sangli Police
Neera Canal : धक्कादायक! पाणी पुरवठा करणाऱ्या नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या; रामराजे नाईक निंबाळकरांच्या स्टेट्सने प्रकार उघड

पकडणे होणार सोपे 

बसस्थानकातून होत असलेले चोरीचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. हे चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यामुळे ज्या रेकॉर्डवरील महिला आहेत; त्यांचे पोस्टर बसस्थानकामध्ये आले आहेत. जेणेकरून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि या चोर महिला पासून सावध राहण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच अशा महिला निदर्शनास आल्यास तात्काळ प्रवाशी जागरूक होऊन पोलिसांना संपर्क करतील आणि या रेकॉर्डवरील महिला चोरांना पकडण्यात आम्हाला यश मिळेल. यासाठी ही पोस्टरबाजी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com