Daund Police : पोलिस दलाची अंतर्गत सुरक्षा भेदली; बॅरेकमध्ये ठेवलेले पोलिसांचे मोबाईल लांबविले

Baramati News : बारामती जिल्ह्यातील दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाचे कार्यालय आहे. पोलिसांचे साहित्य ठेवण्यासाठी बॅरेकची व्यवस्था आहे. या बॅरेकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल ठेवण्यात आले होते
Daund Police
Daund PoliceSaam tv
Published On

मंगेश कचरे 

बारामती : चोरटे पोलिसांना देखील जुमानत नसल्याचा अनुभाग बारामती जिल्ह्यात पाहण्यास मिळाला आहे. यात दौंडमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या बॅरेकमध्ये ठेवलेले मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे लांबविल्याची घटना समोर आली आहे. अर्थात पोलिस दलाची अंतर्गत सुरक्षा भेदून हि चोरी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

बारामती जिल्ह्यातील दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाचे कार्यालय आहे. याठिकाणी पोलिसांचे साहित्य ठेवण्यासाठी बॅरेकची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या बॅरेकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे मोबाईल ठेवण्यात आलेले होते. या ठिकाणाहून चार पोलिसांचे मोबाईल आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी झाली आहे. राज्य राखीव पोलिस दलाची अंतर्गत सुरक्षा भेदून ही चोरी करण्यात आली आहे. 

Daund Police
Buldhana Crime : जुना वाद उफाळून आला; पिता- पुत्रावर जीवघेणा हल्ला, पित्याचा मृत्यू

दौड पोलिसात गुन्हा दाखल 

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच मधील बॅरेक येथे ३ मार्च रोजी रात्री दहा ते ४ मार्च रोजी रात्री साडेबारा च्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे. दरम्यान सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या संदर्भात दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. 

Daund Police
Chilli Farming : एक एकरात मिरचीची लागवड; पहिल्याच तोडणीत शेतकऱ्याला १ लाख रुपयांचे उत्पन्न

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

चोरट्यांकडून घरफोडी, मंदिरात चोरी केल्या जात असल्याचे घटना सातत्याने घडत आहे. मात्र दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाचे अंतर्गत सुरक्षा भेदून ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचे काय? असाही प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com