Chilli Farming : एक एकरात मिरचीची लागवड; पहिल्याच तोडणीत शेतकऱ्याला १ लाख रुपयांचे उत्पन्न

Latur News : शेतकऱ्याने दोन महिन्यांपूर्वी ५० गुंठे अर्थात एक एकर क्षेत्र असलेल्या शेतात मिरचीची लागवड केली. मिरची चांगल्या प्रकारे बहरली असून मिरची तोडणीला सुरवात झाली आहे
Chilli Farming
Chilli FarmingSaam tv
Published On

संदीप भोसले 
लातूर
: शेती करताना वेगळे प्रयोग करत भरघोस उत्पन्न शेतकरी घेत असतात. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मिरची लागवडीतून चांगले उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. एक एकर क्षेत्रात लागवड केलेल्या मिरचीची तोडणी सुरु झाली आहे. या पहिल्याच तोडणीतून शेतकऱ्याला एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

लातूरच्या निलंगा तालुक्यातील कोराळी या शिवारात शेतकरी ताजोद्दीन मुजावर या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली आहे. ताजोद्दीन मुजावर या शेतकऱ्याने दोन महिन्यांपूर्वी ५० गुंठे अर्थात एक एकर क्षेत्र असलेल्या शेतात मिरचीची लागवड केली. मिरची चांगल्या प्रकारे बहरली असून मिरची तोडणीला सुरवात झाली आहे. तोडणी होत असताना मार्केटमध्ये देखील चांगला भाव शेतकऱ्याला मिळत आहे. 

Chilli Farming
Zp School : शिक्षक दोन वाजेपर्यंतच भरवितोय शाळा; विद्यार्थ्यांना नावही लिहता येईना, अकोला जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

लागवडीसाठी ६५ हजाराचा खर्च 

शेतकरी मुजावर यांना मिरची लागवडीसाठी जवळपास ६० ते ६५ हजार इतका खर्च आला असून, पहिल्या दोन तोडणीतून हाती आलेल्या मिरच्यांची हैद्राबाद येथील मार्केटमध्ये ३० ते ३५ रुपये किलो या दराने त्यांनी विक्री केली. चांगल्या दर्जाची मिरची असल्याने चांगल्या दराने विक्री होत आहे. या विक्रीतून खर्च वजा जाता त्यांना जवळपास २० हजार रुपये इतका नफा मिळाला आहे.

Chilli Farming
Buldhana Crime : जुना वाद उफाळून आला; पिता- पुत्रावर जीवघेणा हल्ला, पित्याचा मृत्यू

चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित 

मिरचीच्या पहिल्या दोन तोडणीतच या शेतकऱ्याला जवळपास एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर आणखी तोडणी सुरू असून, आगामी काळात मिरचीला आणखी भाव मिळण्याची शक्यता आहे. अर्थात या पुढेही मिरचीला बाजारभाव चांगला राहिल्यास जवळपास तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळण्याची त्यांना अपेक्षा शेतकऱ्याला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com