Zp School : शिक्षक दोन वाजेपर्यंतच भरवितोय शाळा; विद्यार्थ्यांना नावही लिहता येईना, अकोला जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Akola News : काही महिन्यांपूर्वी शाळेतील महिला शिक्षिका सेवानिवृत्त झाली. तेव्हापासून शाळेत नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. दुसऱ्या शाळेवरून इतर शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येतो
Zp School
Zp SchoolSaam tv
Published On

अक्षय गवळी 

अकोला : जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाल्याचे पाहण्यास मिळत असते. त्यात जिल्हा परिषद शाळांमधील काही शिक्षक देखील शिकविण्याकडे दुर्लक्ष करत असतात. दरम्यान अकोल्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेच्या मास्तराने तर कमालचं केली आहे. पाच वाजेपर्यंत भरणाऱ्या शाळेला दुपारी दोन वाजताच टाळ ठोकले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

अकोला जिल्ह्यातील जऊळखेड गावात असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी पर्यंत एकत्रित २७ विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक एकच. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी या शाळेतील महिला शिक्षिका सेवानिवृत्त झाली. तेव्हापासून या शाळेत अद्याप नवीन शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. दुसऱ्या शाळेवरून इतर शिक्षक इथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येतो. मात्र तोही शिक्षक दुपारी दोन वाजेपर्यंतच शाळा चालवत आहे. 

Zp School
Maval Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेसोबत केले भयंकर; दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

घडल्या प्रकाराने पालक पोहचले शाळेत 

शाळेची वेळ ५ वाजेपर्यंत असून जिल्हा परिषद शाळा आता थेट दुपारी दोन वाजताच बंद केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना अजून पर्यंत आपले नाव देखील लिहिता येत नाही. या प्रकारामुळे आज अखेर संतप्त पालकांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देत मोठा गोंधळ घातला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा एक अहवाल सादर करत वरिष्ठांना देणार असल्याचे केंद्रप्रमुख रवींद्र चौथमल यांनी सांगितले. तसेच सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळा भरवण्याची सूचना देखील देण्यात आल्याचे ते म्हटले.

Zp School
Beed : आकाशात भला मोठा आवाज, नंतर जमिनीवर कोसळले दगड; खळवट लिमगांवात भयानक प्रकार, गावकरी भयभीत

शाळा खोल्याही जीर्ण 
विशेष म्हणजे या शाळेतील अनेक खोल्या जीर्ण झाल्या आहेत. तर काही खोल्यांची छत कोसळले आहे. त्यामुळे १ ते ४ पर्यंतचे वर्ग एकाच खोलीत भरवले जातात. त्यातही एकच शिक्षक सर्वांना शिक्षणाचे धडे देतो. तेही केवळ दोन तास पुरतेचं. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना समोर जावे लागते. अनेकांना गणिताचे पाढे येत नाहीत. शिक्षकाचे विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष होत असल्याचा हा धक्कादायक प्रकार खुद्द पालकांनी समोर आणला आहे. अचानक पालकांनी शाळेत दिलेल्या भेटीनंतर हा संपूर्ण गोंधळ आणि प्रकार उघडकीस आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com