योगेश काशिद
बीड : आकाशात प्रचंड मोठा आवाज होऊन तीन- चार दगड पडल्याची घटना बीड जिल्ह्यातील मौजे खळवट लिंमगांव येथे घडली आहे. आकाशातून अचानक दगड कोसळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान माहिती मिळताच तहसिल प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी आणि पंचनामा केला आहे. तसेच आकाशातून पडलेले दगड देखील ताब्यात घेतले आहेत.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खवळट लिमगाव येथे ४ मार्चला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आकाशामध्ये तीन मोठे आवाज झाले. यानंतर आकाशामधून दगड कोसळल्याचा प्रकार घडला आहे. यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला. दगडाचा वेग इतका होता कि घरावरील पत्रा तुटून दगड खाली पडला आहे. तसेच अन्य दोन दगड इतर शेतामध्ये पडले अशी माहिती गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
घरावर पडलेला दगड वेगळा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच दगड ज्यावेळी पडला त्यावेळी हा दगड खूप गार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच खवळट लिमगावच्या आजूबाजूच्या गावच्या नागरिकांनी देखील भला मोठा आवाज ऐकू आल्याचे सांगितले आहे. मात्र हा आवाज नेमका कशाचा झाला आणि दगड नेमके कुठून पडले, तसेच पुन्हा संध्याकाळी ही घरावर दगड पडतील का या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडवणी तहसील प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत दगड ताब्यात घेतले आहेत. तर आज सकाळी एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरचे अभ्यासक श्रीनिवस औंधकर, अभिनव विटेकर यांच्या टिमने भेट देत पाहाणी केली आहे. आवाज कशामुळे झाला, दगड पडण्याचे कारण काय? यांचे गूढ काय ते लवकरच कळवू अशी माहिती दिली आहे. सदरील एक दगड तहसिलदार यांच्याकडून घेतला आहे. तर यातील एक दगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.