Angry villagers from Inam Dhamani staging a protest at Sangli Police Headquarters demanding strict action after a brutal murder Saam Tv
महाराष्ट्र

मुलासमोरच बापाची नशेखोरांनी केली हत्या, संतप्त ग्रामस्थांचा पोलिस मुख्यालयावर मोर्चा

Sangli Murder Case Villagers Protest Police Headquarters: सांगलीतील लिमये मळा परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेनंतर इनाम धामणी गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून नशेखोरीविरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Omkar Sonawane

सांगली शहरातील लिमये मळा परिसरात गाडीची हेडलाईट पडल्याच्या क्षुल्लक कारणातून नशेखोरांनी वडिलांचा मुलासमोरच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या हल्ल्यात मुलगा सुयश हा गंभीर जखमी झाला होता. मृत क्रांती कुमार शेडबाळे यांच्या खुनानंतर संतप्त झालेल्या इनाम धामणी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी संताप व्यक्त करत पोलिसांना धारेवर धरले होते. लिमये मळा परिसरात खुल्या भूखंडावर नशेखोरांचा राजवसपणे हैदोस सुरू असतो त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार मागणी करून देखील त्याच्यावर अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप इनाम धामणी गावच्या ग्रामस्थांचा होता.

या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक करत एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले होते. या घटनेने सांगलीतील नशे खोरीचा काळाबाजार उघड झाला आहे. या सर्व प्रकाराबाबत कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी इनाम धामणीतील ग्रामस्थांनी आज पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता. प्रारंभी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार मागणी करून देखील त्याच्यावर अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप इनाम धामणी गावच्या ग्रामस्थांचा होता. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक करत एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतले होते. या घटनेने सांगलीतील नशे खोरीचा काळाबाजार उघड झाला आहे. या सर्व प्रकाराबाबत कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी इनाम धामणीतील ग्रामस्थांनी आज पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता.

यानंतर पोलीस मुख्यालयात संतप्त ग्रामस्थांनी ठिया मारला होता. कारवाई करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्वतः ग्रामस्थांशी संवाद साधत निवेदन स्वीकारले. विश्रामबागसह ग्रामीण भागातील खुल्या भूखंडावर पोलिसांची गस्त वाढवण्यात येत आहे.

नशेखोरी करणाऱ्यांविरोधात आम्ही कठोर कारवाई करू. असे प्रकार कुठे आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा त्यांची नावे गोपनीय ठेऊ, गुन्हेगारी रोखण्यास आमचे प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी जमावाला आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT