Bribery Case : पोलीस अधिकाऱ्याला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

Sangli Miraj Police Bribery Case News : सांगलीच्या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांना हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bribery Case : पोलीस अधिकाऱ्याला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
Sangli Miraj Police Bribery Case NewsSaam Tv
Published On
Summary
  • मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अटकेत

  • हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६ लाखांची लाच

  • ACB ने सापळा रचून रंगेहाथ पकडले

  • याप्रकरणी गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

सांगलीमधून भुवया उंचावणारी बातमी समोर आली आहे. एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला ६ लाखांची लाच घेताना रंगे हाथ पकडण्यात आले आहे. हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी ही लाच घेतली असल्याचं धक्कादायक कारण पुढे आलं आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांनी तक्रारदाराचा हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी तब्बल ८ लाखांची लाच मागितली होती. तडजोडी अंती सहा लाखांची लाच घेण्याचे ठरले.

Bribery Case : पोलीस अधिकाऱ्याला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
Police Corruption News : गुन्हा माफ करतो सांगितलं, ४ लाखांची लाच घेतली; पोलिस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले, VIDEO पाहा

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या तक्रारीची खात्री पटवण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. सापळा रचल्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठरल्यानुसार, सांगलीच्या मिरज मध्ये धाड टाकत ६ लाख रुपये घेताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मात्र त्यामुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com