Beed Accident: रेसच्या नादात भाजप नगरसेवकाच्या मुलाने घेतला दाम्पत्याचा जीव; अपघाताचा थरारक CCTV Video आला समोर

Beed Accident CCTV Video Viral : बीडमधील माजलगाव येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. २० नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.
Beed Accident: Couple Killed In Speeding Car Crash, Cctv Video Emerges
Beed Accident: Couple Killed In Speeding Car Crash, Cctv Video Emergessaam tv
Published On: 
Summary
  • बीड जिल्ह्यातील माजलगावच्या गढी रोडवर भीषण अपघात झाला.

  • २० नोव्हेंबर रोजी दुपारी हा अपघात घडला.

  • भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.

बीडच्या माजलगाव येथील गढी रोडवर झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. २० नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या अपघातामध्ये गायकवाड दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बीडच्या माजलगाव येथील भाजपचे नगरसेवक दिलीप मेंडके यांचा मुलगा दक्ष मेंडकेंच्या भरधाव कारनं गायकवाड पती-पत्नीचा जीव घेतला.

नगरसेवकाचा मुलगा दक्ष मेंडकेनं कारची शर्यत लावली होती. त्यात हा अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. या रेसच्या नादातच दुचाकीवरील कुटुंबाला शंभर ते दीडशे फूट फरफटत नेले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना माजलगाव शहरातील गढी रोडवरील एका पेट्रोल पंपाबाहेर घडली. प्रल्हाद गायकवाड हे आपली पत्नी सुनीता हिच्यासोबत मोटारसायकलवरून पेट्रोल पंपावरून बाहेर पडत असताना दक्षची कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. धडकेनंतर गायकवाड दांपत्य हे हवेत उंच उडून खाली रस्त्यावर पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय.

Beed Accident: Couple Killed In Speeding Car Crash, Cctv Video Emerges
भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वातील अनुभवी चेहरा हरपला; माजी खासदाराचं निधन,राजकीय वर्तुळात शोककळा

या अपघातात प्रल्हाद गायकवाड हे जागीच ठार झाले होते तर सुनीता गायकवाड यांना उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गाड्यांच्या शर्यतीतून ही दुर्घटना घडल्याची चर्चा असून माजलगाव शहर पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

Beed Accident: Couple Killed In Speeding Car Crash, Cctv Video Emerges
धुळ्यावर शोककळा! देवदर्शनावरून परतताना पवार कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

नंदुरबारमध्ये भरधाव कारने १८ वर्षीय तरुणाचा जीव घेतला

निलेश वरसाळे हा खेतिया येथे सलूनचे काम आटोपून दुचाकीवरून आपल्या ब्राह्मणपुरी गावाकडे परतत होता. गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूर फाट्याजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाल्याने परिसरात शोककळा पसरलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.