धुळ्यावर शोककळा! देवदर्शनावरून परतताना पवार कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

Kota Road Accident : राजस्थानमधील कोटा येथे खाटू श्यामचे दर्शन घेऊन परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील पवार कुटुंबाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले आहेत.
Dhule Pawar Family Accident
Dhule Pawar Family Accident Saam TV
Published On: 

Dhule Pawar Family Accident : राजस्थानमधील खाटू श्याम येथे देवदर्शन करून परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला कोटा येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत पवार कुटुंबातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर कोटा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील आणि नात्यागोत्यातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने धुळे शहरातील सत्यसाईबाबा नगर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.

कोटा (राजस्थान) येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील भाविक तीन वाहनांतून खाटू श्याम येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना या तीन वाहनांपैकी 'MH-18/CL/3005' या क्रमांकाच्या फोर्स ट्रॅव्हलर वाहनाचा काल रात्री १२ वाजेच्या सुमारास कोटा येथे भीषण अपघात झाला. या वाहनात एकूण १५ प्रवासी होते. त्यापैकी ९ जणांचा जागीच अंत झाला, तर ६ जण जखमी झाले. सर्व मृतदेह कोटा येथील न्यू मेडिकल कॉलेज रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

अपघातातील मृतांची नावे:

सज्जन दौलत पवार (वय ७०, रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे)

उषा सज्जन पवार (वय ६०, रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे)

बाबूलाल दौलत पवार (वय ७३, रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, धुळे)

सुशीला बाबूलाल पवार (वय ६५, रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, धुळे)

कैलाश भगवान पवार (वय ४५, रा. अमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे)

अनिता कैलाश पवार (वय ४०, रा. अमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे)

जानवी कैलाश पवार (वय १३, रा. अमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे)

माधवी गणेश पवार (वय ४५, रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे)

सान्वी गणेश पवार (वय ६, रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे)

Dhule Pawar Family Accident
Accident Death : महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर; एकाच कुटुंबातील ९ जणांचा अपघाती मृत्यू, देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

अपघातातील जखमींची नावे:

मनीषा शरद पवार (वय ४१, रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, धुळे)

मयुरी शरद पवार (वय २०, रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, धुळे)

जगदीश कैलाश पवार (वय १०, रा. अमराळे, ता. शिंदखेडा, जि. धुळे)

श्रीजीत गणेश पवार (वय ४, रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे)

शरद बाबूलाल पवार (वय ४५, रा. नवनाथ नगर, सुरत बायपास, धुळे)

गणेश सज्जन पवार (वय ३२, रा. शांतिगीत नगर, सुरत बायपास, धुळे)

एकाच परिवारातील आजी-आजोबांपासून ते लहान चिमुकल्यांपर्यंत नऊ जण काळाच्या पडद्याआड गेल्याने धुळे शहर आणि शिंदखेडा तालुक्यातील अमराळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dhule Pawar Family Accident
BJP OBC Morcha : भाजप ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातील चौघांना संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.