मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या महामार्गावर प्रवासी आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी २२ ठिकाणी कंटेनर शौचालय उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एमएसआरडीसीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना शौचालय शोधण्यात अडथळे येणार नाहीत आणि त्यांची गैरसोय टळणार आहे.
समृद्धी महामार्गावर २२ ठिकाणी शौचालय बांधण्यात येणार आहे. ६० ते ६५ किलोमीटर अंतरावर ही शौचालये असणार आहेत. २० आसन क्षमतेची ही शौचलय असणार आहेत. या शौचालयांमध्ये महिला, पुरूष आणि दिव्यांग नागरिकांसाठी व्यवस्था केली जाणार आहे. या शौचालयाच्या उभारणीसाठी एमएसआरडीसीने कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे, ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर आता रेस्टॉरंट, ढाबा, गॅरेज, पार्किंग लॉट, टॉयलेट यासारख्या वेगवेगल्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता एमएसआरडीसीने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी समृद्धी महामार्गालगतच्या जागेवर वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उभारण्यासाठी एमएसआरडीसीने निविदा मागवण्यात आल्या आहेत. एमएसआरडीसीच्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त ८ तासांमध्ये गाठता येणार आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. सध्या समृद्धी महामार्गावरील नागपूर ते इगतपुरी हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे. लवकरच इगतपुरी- आमने हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला होण्यापूर्वी त्याठिकाणी प्रवाशांसाठी सर्व सोयीसुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
समृद्धी महामार्गावर एकूण २२ ठिकाणी शौचालय उभारण्यात येणार आहेत. हे शौचालय २० आसन क्षमतांचे असणार आहे. यामध्ये पुरुषांसाठी ८, दिव्यांग पुरुषांसाठी २, महिलांसाठी ८ आणि दिव्यांग महिलांसाठी २ अशी आसन व्यवस्था केली जाणार आहे. या शौचालयांच्या उभारणीसाठी कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. कंपनी निश्चित झाल्यानंतर कामाला सुरूवात केली जाणार आहे. या शौचालयांमध्ये प्रवाशांना पूर्ण वेळ मुबलक पाण्याची सुविधा देखील मिळणार आहे. त्यामुळे यापुढे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना शौचालय कुठे हे शोधण्याची गरज भासणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.