Samruddhi Mahamarg Accident News Today : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. रविवारी रात्रीही समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. खासगी बसचा भीषण अपघात झाल्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय.
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला. वाशिममधील वनोजाच्या जवळ अपघात झाल्याचे समोर आलेय. महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या डिव्हायडरला जोरदार धडक बसल्यामुळे खासगी बस उलटली. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर २० प्रवाशी जखमी झाले आहेत, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बसमध्ये ३० ते ३५ जण प्रवास करत होते. वाशिममधील वनोजा येथे खासगी बस डिव्हायरलचा धडकल्यामुळे अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काही रूग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.
राजलक्ष्मी कंपनीची साईरथ नावाची खासगी बस पुण्यावरून नागपूरकडे निघाली होती. या बसमध्ये ३५ जण प्रवास करत होते. वाशिममध्ये बस आल्यानंतर काळाने घाला घातला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. त्याशिवाय वाशिमचे आमदार श्याम खोडे आणि शेलूबाजार येथील युवक मदतीसाठी अपघातस्थळी दाखल. रुग्ण वाहिकेतून जखमी प्रवास्यांना कारंजा आणि अकोला इथे उपचारासाठी पाठवण्यात आलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.