Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. एक्सप्रेस वे सुरू झाल्यास मुंबई आणि नागपूर यादरम्यानचा प्रवास फक्त आठ तासांत पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा महामार्ग मार्च महिन्यात पूर्णपणे सुरू होणार आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आणि गेमचेंजर ठरेल. समृद्धी महामार्ग हा टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आला. अखेरच्या टप्प्याचे काम १०० टक्के पूर्ण झालेय, मार्च महिन्यात हा महामार्ग सुरू होणार आहे. गुढी पाडव्याला समृद्धी महामार्ग १०० टक्के प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नागपूर ते मुंबई यादरम्यान ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway is now fully complete) मार्च महिन्यात सुरू होणार आहे. सध्या नागपूर ते इगतपुरी यादरम्यान हा एक्सप्रेस वे कार्यरत आहे. अखेरचे ७६ किमीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राच्या विकासात गेमचेंजर (key infrastructure project) ठरणारा हा महामार्ग देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लवकरच महाराष्ट्राला समर्पित करतील.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्ग मार्च महिन्यात सुरू होणार असल्याचा दुजोरा देण्यात आला आहे. सध्या नागपबर ते इगतपुरी हा ६२५ किमी पर्यंतचा महामार्ग सुरू आहे. समृद्धी महामार्गच्या अखेरच्या टप्प्यातील ७६ किमीचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, अखेरचं काम वेगात सुरू आहे. १० मार्चपर्यंत पूर्णपणे काम पूर्ण होईल.
समृद्धी महामार्गाबद्दल या गोष्टी माहित आहेत का? Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: All You Need To Know
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गला अधिकृतपणे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जाते.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे प्रवाशांचे तब्बल ८ तास वाचणार आहे. याआधी या प्रवासासाठी तब्बल १६ तास लागत होते. भविष्यात हा महामार्ग जेएनपीटी आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यात येणार आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. डिसेंबर २०२४ मध्ये अखेरचा टप्पा इगतपुरी-मुंबई सुरू होणार होता, पण महाराष्ट्र सरकारने काही बदल केल्यामुळे उशीर होत आहे. ताज्या अपडेटनुसार, हा महामार्ग मार्च महिन्यात सुरू होणार आहे.
एक्सप्रेस वे चा कोणता टप्पा कधी सुरू झाला? When Was the Expressway Inaugurated?
११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी यादरम्यानच्या ५२० किमीच्या पहिला टप्प्याचे उद्घाटन केले होते.
२३ मे २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. शिर्डी ते भरवीर हा १०५ किमीचा महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाला होता.
४ मार्च २०२४ रोजी भरवीर ते इगतपुरी हा टप्पा सुरू झाला होता.
समृद्धी महामार्गासाठी खर्च किती?
सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा 701 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती महामार्ग, भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्गांपैकी एक आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रामधून जातो. या द्रुतगती महामार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांमधला संपर्क वाढण्यातही मदत होईल, परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यात मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.