Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Traffic Block: प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! समृद्धी महामार्गावर ५ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक, कधी आणि कुठे?

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर ५ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या ९ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल. कधी आणि कुठे हा ट्रॅफिक ब्लॉक असणार घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • समृद्धी महामार्गावर ५ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक

  • अमरावती जिल्ह्यात गॅन्ट्री उभारणीचे काम केले जाणार

  • ठराविक वेळेत ४५ ते ६० मिनिटे वाहतूक बंद राहिल

  • मुंबई ते नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होणार

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावर ५ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर येत्या ९ जानेवारी ते १३ जानेवारी या ५ दिवसांच्या कालावधीत ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीमध्ये महामार्गावर गॅन्ट्री उभारण्याचे काम केले जाणार आहे. समृद्धी महामार्गावर ५ दिवस कुठे आणि कधी ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

समृद्धी महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारले जाणार आहेत. हे काम १० टप्प्यांमध्ये केले जाणार असून ते ५ दिवस चालणार आहे. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या किमी ९०+५०० ते किमी १५०+ ३०० या दरम्यान हे काम केले जाणार आहे.

या कामासाठी प्रत्येक टप्प्यादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णपणे बंद केली जाईल. ते काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल. यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे योग्य नियोजन करूनच प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- ९ जानेवारी -

चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड गावाजवळील साखळी क्रमांक १२०.३०० तसेच धोत्रा गावाजवळील साखळी क्रमांक १२५.४०० या ठिकाणी मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहिल.

- १० जानेवारी -

चांदूर रेल्वे येथील खंबाळा गावाजवळील साखळी क्रमांक १३०.४०० येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते १ या वेळेत बंद ठेवण्यात येईल.

- १२ जानेवारी -

चांदूर रेल्वे तालुक्यातील शहापूर खेकडी गावाजवळील साखळी क्रमांक १४५.२०० येथे नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तर याच दिवशी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाचोड गावाजवळील साखळी क्रमांक १४०.५०० याठिकाणी नागपूर वाहिनीवरील वाहतूक दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत बंद राहिल.

- १३ जानेवारी रोजी नांदगाव खंडेश्वर येथील देऊळगाव परिसरातील साखळी क्रमांक १५०.३०० येथे मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत बंद करण्यात येईल. तर याच दिवशी शहापूर खेकडी गावाजवळील साखळी क्रमांक १४५.२०० येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत बंद असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT