Samruddhi Expressway Block: समृद्धी महामार्गावर ३ दिवसाचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे असेल बंद अन् कुठे असेल सुरू?

Samruddhi Expressway Block: समृद्धी एक्सप्रेसवेवर तीन दिवसांचा टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात आलाय. कुठे-कुठे महामार्ग बंद असेल ते जाणून घ्या. दरम्यान महामार्गावर ब्लॉक का घेण्यात येणार आहे, त्याचे कारण जाणून घेऊ
Samruddhi Expressway Block:
Vehicles seen moving on the Samruddhi Expressway ahead of the announced three-day traffic block.saamtv
Published On
Summary
  • समृद्धी महामार्गावर ३ दिवस टप्प्याटप्प्याने ब्लॉक

  • देखभाल आणि सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय

  • काही भाग बंद तर काही भाग वाहतुकीसाठी सुरू

राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गाबबात मोठी अपडेट आहे. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनेमुळे हा महामार्ग नेहमी चर्चेत असतो. दरम्यान हा महामार्ग पूर्ण झाल्यानंर या महामार्गावरून दिवसभरात लाखों प्रवासी प्रवास करतात. आता महामार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तब्बल तीन दिवस टप्प्याटप्याने या महामार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करणार असला तर योग्य नियोजन करा.

जाणून घ्या ब्लॉकचं वेळापत्रक

धामणगाव ते चांदूर रेल्वे दरम्यानच्या समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसवण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवस तासाभरासाठी समृद्धी महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आलीय.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम अंतर्गत धामणगाव ते चांदूर रेल्वे दरम्यान गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम २७ ते २९ डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत पाच टप्प्यात करण्यात येईल.

वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरता बंद

या कामासाठी नगरगांवडी, टिटवा या गावातील वाहतूक बंद राहणार आहे. या प्रत्येक टप्प्यादरम्यान कामाच्या टप्प्या जवळ संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरता थांबविण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

Samruddhi Expressway Block:
New Highway: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक महामार्ग, कल्याण ते लातूर प्रवास फक्त ४ तासांत; काय आहे सरकारचा प्लान?

नगरगावंडी -मुंबई वाहिनी २७ डिसेंबर दुपारी २ ते दुपारी ३ किंवा दुपारी ३ ते दु ४

नगरगावंडी- मुंबई वाहिनी २७ डिसेंबर दु. २ ते दु. ३ किंवा दु. ३ ते दु. ४

नगरगावंडी- नागपूर वाहिनी २८ डिसेंबर दु. २ ते दु. ३ किंवा दु. ३ ते दु. ४

टिटवा- नागपूर वाहिनी २९ डिसेंबर सकाळी ११ ते दु. १२ किंवा दु. १२ ते दु. १

टिटवा- मुंबई वाहिनी २९ डिसेंबर स. ११ ते दु. १२ किंवा दु. १२ ते दु. १

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com