Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार! एकाच नंबरच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Orchid School Bus Fraud : मुंबईतील नामांकित शाळेत एकाच क्रमांकाच्या दोन बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार RTO तपासणीत उघड झाला. दोन वर्षांहून अधिक काळ विनानोंदणी बस चालवल्याप्रकरणी शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार! एकाच नंबरच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
Mumbai Orchid School Bus FraudSaam Tv
Published On
Summary
  • मुंबईत एकाच क्रमांकाच्या दोन स्कुल बसमधून विद्यार्थ्यांची ने आण

  • RTO तपासणीत चेसिस क्रमांकात तफावत

  • दोन वर्षे विनानोंदणी बस चालविल्याचा आरोप

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील नामांकित शाळेच्या एकाच क्रमांकाच्या दोन वेगवेगळ्या स्कुलबसमधून विद्यार्थ्यांची ने आण सुरु असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित शाळेतील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटार वाहन निरीक्षक संकेतकुमार चव्हाण हे १६ डिसेंबरला भरारी पथकासह गस्त घालत होते. दुपारी अडीचच्या सुमारास फायर ब्रिगेड, गव्हाणपाडा, मुलुंड पूर्व परिसरात ऑर्किड स्कूलची बस (क्रमांक एमएच ०४ एलवाय ६०१८) तपासणीसाठी थांबवण्यात आली. ई-चलन यंत्राद्वारे तपासणी केली असता वाहनाच्या नोंदणीकृत तपशिलात दाखविलेला चेसिस क्रमांक आणि प्रत्यक्ष बसवर कोरलेला चेसिस क्रमांक वेगवेगळे असल्याचे आढळले.

Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार! एकाच नंबरच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

यानंतर या बसची अधिक तपासणी केल्यावर ही बस गेले २ वर्षांहून अधिक काळ वैध नोंदणीशिवाय चालवली जात असल्याचे उघड झाले. तपासादरम्यान बसचालक कोणतीही माहिती न देता आणि पोलिसांना सहकार्य न करता पळून गेला. तसेच शाळेनेही सह‌कार्य केले नाही. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी बस ताब्यात घेऊन कुर्ला नेहरूनगर बस आगारात जमा केली. विनानोंदणी वाहन चालविल्याप्रकरणी चालक व मालकाविरोधात चलन काढले असून, सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे.

Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार! एकाच नंबरच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

या प्रकरणात वाहनमालक, संबंधित शैक्षणिक संस्था बस डीलर तसेच शाळेचे संचालक व प्राचार्य यांनी एकत्रितरित्या शासनाची आठ लाख ६६ हजार ४२१ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यात वाहन कर, नोंदणी शुल्क, इत्यादींचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याऱ्यांच्या लेखी आदेशानुसार संकेत कुमार चव्हाण यांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे. शिवाय पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com