Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

Maharashtra Gharkul Yojana Pune Maval : मावळ तालुक्यातील आदिवासी कातकरी-ठाकर समाजासाठी घरकुलाऐवजी सुसज्ज कॉलनी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आदिवासी कुटुंबांना कायमस्वरूपी, सुरक्षित व सन्मानाने जगण्यासाठी हक्काचा निवारा मिळणार आहे.
Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार
Maharashtra Gharkul Yojana Pune MavalSaam Tv
Published On
Summary
  • मावळ तालुक्यात आदिवासींसाठी घरकुलाऐवजी कॉलनी उभारणीचा निर्णय

  • कातकरी-ठाकर समाजाला पूर्णतः तयार व सुरक्षित घरे मिळणार

  • अपूर्ण घरांची समस्या कायमची संपणार

  • राज्यातील इतर भागांसाठी हा उपक्रम ठरणार आदर्श

दिलीप कांबळे, मावळ

मावळ तालुक्यातील आदिवासी कातकरी व ठाकर समाजासाठी हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे, या उद्देशाने एक ऐतिहासिक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्य सरकारची भूमिका प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्काचे घर मिळावे अशी असून, त्यासाठी अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घरकुल योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने चेकद्वारे आर्थिक मदत दिली जाते. मात्र मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कातकरी-ठाकर समाजाच्या बाबतीत ही योजना अपेक्षित परिणाम साधू शकलेली नाही. पहिला हप्ता मिळाल्यानंतर थोडेफार बांधकाम केले जाते, दुसरा हप्ता मिळाल्यावर आणखी काम होते; मात्र अपुऱ्या निधीमुळे, स्थलांतर, अज्ञान किंवा इतर अडचणींमुळे अनेक घरे अपूर्णच राहतात.

ही बाब लक्षात घेऊन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेत एक अभिनव निर्णय घेतला आहे. घरकुलाची रक्कम वैयक्तिकरित्या देण्याऐवजी, त्या निधीचा उपयोग करून एकत्रितपणे सुसज्ज कॉलनी उभारण्यात येणार आहे. या कॉलनीसाठी घरकुल योजनेतील निधीसोबतच संबंधित नगरपरिषद तसेच सामाजिक बांधिलकीतून उद्योजकांकडून डोनेशन स्वरूपात अतिरिक्त निधी उभारला जाणार आहे.

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार
Pune : पुण्यात बायकर्सची स्टंटबाजी! पर्यटकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास

या माध्यमातून प्रत्येक आदिवासी कातकरी-ठाकर कुटुंबाला पूर्णतः तयार, सुरक्षित व कायमस्वरूपी घर मिळणार आहे.या उपक्रमामुळे केवळ घरांची उभारणीच नव्हे तर पाणी, वीज, रस्ते व मूलभूत सुविधांसह नियोजनबद्ध वसाहत निर्माण होणार असून आदिवासी कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यास आणि उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार
Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

घर अपूर्ण राहण्याची समस्या कायमची मिटणार असून, आदिवासी समाजाला सन्मानाने जगण्यासाठी हक्काचा निवारा मिळणार आहे. घरकुलाऐवजी कॉलनी उभारणीचा हा उपक्रम राज्यातील पहिलाच असल्याने, तो भविष्यात इतर तालुके व जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com