Shreya Maskar
चापूनचोपून साडी नेसायची असेल तर शिफॉन, जॉर्जेट, क्रेप, सिल्क सारखे हलके कापड निवडावे. हे कापड अंगावर व्यवस्थित बसतात. तसेच सांभाळायला सोपी जाते.
साडी नेसताना पेटीकोट नाभीच्या बरोबर खाली बांधावा. यामुळे पोटही दिसत नाही आणि साडी फुगेरी वाटत नाही. तुम्ही अगदी स्लिम आणि ट्रिम दिसाल.
खूप कमी निऱ्या आल्या तरी साडीचा लूक बिघडतो, तसेच खूप जास्त निऱ्या असल्या तरी समोरच्या बाजूने पोटाजवळ फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे निऱ्या पातळ, छोट्या काढाव्यात.
साडीच्या निऱ्या कधीही मधोमध किंवा नाभीच्या किंचित डाव्या बाजूसा काढाव्या. यामुळे निऱ्या व्यवस्थित येतात आणि सुंदर दिसतात.
नाभीच्या बरोबर सरळ लाईनमध्ये निऱ्या खोचल्या गेल्या पाहिजेत. यामुळे साडीचा लूक अतिशय परफेक्ट येतो. तसेच तुम्हाला साडीत चालताना कोणतीही समस्या येणार नाही.
साडीचा पदर खूप मोठा किंवा खूपच लहान नसावा. कधीही पदर गुडघ्याच्या खाली आणि पोटऱ्यांच्या वर असावा. जेणेकरून तुम्हाला नीट सांभाळता येईल. तसेच छान खुलून दिसेल.
साडीच्या पदराच्या प्लेट काढण्याताना पदर खांद्यावरून दुमडून घ्या. दुमडलेल्या पदराच्या प्लेट्स काढा आणि व्यवस्थित पिनअप करून घ्या.
चापूनचोपून साडी नेसण्यासाठी योग्य पेटीकोट निवडणे, साडी व्यवस्थित टक करणे, सुरकुत्या न पडू देणे आणि पदर, निऱ्या पिनने सुरक्षित करणे आवश्यक आहे.