Samruddhi Mahamarg: 'मर्सिडीज'ने समृद्धी महामार्ग घेतला दत्तक, अपघात रोखण्यासाठी करणार प्रयत्न; कसा असणार प्लान?

Pratap Sarnaik On Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी 'मर्सिडीज' कंपनीने पुढाकार घेतला आहे. पुढच्या ३ वर्षांत 'मर्सिडीज' कंपनी अनेक उपाययोजना करणार आहे.
Samruddhi Mahamarg: 'मर्सिडीज'ने समृद्धी महामार्ग घेतला दत्तक, अपघात रोखण्यासाठी करणार प्रयत्न; कसा असणार प्लान?
Samruddhi MahamargSaam tv
Published On

Summary -

  • मर्सिडीज कंपनीने समृद्धी महामार्ग पुढच्या ३ वर्षांसाठी दत्तक घेत अपघात रोखण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

  • चालक प्रशिक्षण, दिशादर्शक फलक आणि ट्रॉमा सेंटरची साखळी तयार करून तात्काळ मदत मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

  • रोड हिप्नोसिस टाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या उपक्रमाचे स्वागत करत ई-वाहन क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले.

समृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरूच आहे. या महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने पुढाकार घेतला आहे. मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुणे येथे केले. प्रताप सरनाईक यांनी आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी ही महत्वाची माहिती दिली.

Samruddhi Mahamarg: 'मर्सिडीज'ने समृद्धी महामार्ग घेतला दत्तक, अपघात रोखण्यासाठी करणार प्रयत्न; कसा असणार प्लान?
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, धावत्या ट्रकमधून व्हॅक्सिनचा मुद्देमाल जप्त

प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, 'रोड हिप्नोसिसही अवस्था अनेकदा अपघातास कारणीभूत ठरते. ही अवस्था टाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने समृद्धी महामार्ग पुढच्या तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे. या उपक्रमांतर्गत चालकांना प्रशिक्षण दिले जाईल, अपघात प्रवण क्षेत्रांवर दिशादर्शक लावले जाईल, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी जवळपासच्या ट्रॉमा सेंटरची साखळी निर्माण केली जाईल. तसंच, वाहन चालकांना मार्गदर्शन करणे यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.'

Samruddhi Mahamarg: 'मर्सिडीज'ने समृद्धी महामार्ग घेतला दत्तक, अपघात रोखण्यासाठी करणार प्रयत्न; कसा असणार प्लान?
Samruddhi Mahamarg : समृद्धीवर मध्यरात्री अचानक १०० खिळे ठोकलं, व्हायरल व्हिडिओमागील सत्य आलं समोर

या माध्यमातून मर्सिडीज कंपनीने राज्याच्या रस्ता सुरक्षा अभियानात मोलाचे योगदान दिले असल्याचे देखील प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांनी आज मर्सिडीज कंपनीच्या प्रतिनिधींशी राज्याच्या ई-वाहन धोरणाबाबत देखील चर्चा केली. भविष्यात कंपनीने ई-वाहन क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी, अशी आशा देखील सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.

Samruddhi Mahamarg: 'मर्सिडीज'ने समृद्धी महामार्ग घेतला दत्तक, अपघात रोखण्यासाठी करणार प्रयत्न; कसा असणार प्लान?
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर खिळे कोणी ठोकले? MSRDC नं दिलं स्पष्टीकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com