Manasvi Choudhary
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकल्यामुळे वाहने पंक्चर होत आहेत असा आरोप करण्यात येत आहे.
काल मध्यरात्रीपासून महामार्गावर खिळे दिसत असून यामुळे प्रवास करताना अनेक वाहने पंक्चर झाली आहेत.
समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
समृद्धी महामार्गावर पुलाच्या कामासाठी ग्राउटिंग इन्जेक्शनचे नोजल बसवण्यात आले आहेत. ते खिळे नसून ते विशिष्ट प्रकारचे नोजल आहेत.
रस्त्यावर भेगा पडू नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला ज्यामध्ये इपॉक्सी ग्राउटिंग काँक्रीट वापरला आहे.
इपॉक्सी ग्राउटिंगमध्ये दोन भागांमध्ये उच्च-शक्तीचे इपॉक्सी रेझिन वापरले जाते.
जे कमी-चिकटपणाचे मिश्रण भेगेमध्ये इंजेक्शनद्वारे टाकले जाते. ज्याला नोजल असे म्हणतात.
हे रेझिन भेगेमधील रिकाम्या जागेत खोलवर शिरते आणि पूर्णपणे भरते. कठोर झाल्यावर ते काँक्रीटला पुन्हा जोडते आणि रस्त्याची मूळ ताकद परत आणते.