महाराष्ट्रातील नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळला आहे. नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन गटात दगडफेक झाली. राष्ट्रीय स्वंयसेवंक संघाचं मुख्यालयत असलेल्या नागपुरात दोन गटात वाद उफाळल्यानंतर दगडफेकीनंतर जाळपोळीच्या घटना देखील घडल्या. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ३ दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएसचे सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान सुनील आंबेकरांनी नागपुरातील हिंसाचारावरून विश्व हिंदू परिषदेचे कान टोचले.
औरंगजेबाची कबर हटवण्यावरून वाद उफाळला आहे. याचदरम्यान सुनील आंबेकर यांनी नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केलं. सुनील आंबेकर म्हणाले, 'समाजासाठी कोणत्याही प्रकारची हिंसा योग्य नाही. पोलिसांनी यावर कारवाई केली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही'.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ३ दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही २१ मार्च ते २३ मार्चपर्यंत कर्नाटकच्या राजधानी बेंगळुरूमध्ये आयोजित केली जाणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज १९ मार्च रोजी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ३ दिवसीय बैठकीविषयी माहिती दिली. या बैठकीत देशभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीला संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत. २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. तर बैठकीचा शेवटचा दिवस हा २३ मार्च असणार आहे.
प्रचार प्रमुखांनी सांगितलं की, 'या बैठकीत दोन प्रस्तावावर चर्चा होणार आहे.पहिला प्रस्ताव हा बांगलादेशाविषयी भूमिका आणि संघाच्या शतकपूर्तीच्या कार्यक्रमाविषयी चर्चा होणार आहे. सुनील आंबेकर यांनी पुढे सांगितलं की, 'विजयादशमीच्या दिवशी संघाला १०० वर्ष पूर्ण होणार आहे. १९२५ साली संघाचं कार्य नागपुरातून सुरु झालं. त्यानंतर संघटनेचा देशभरात विस्तार झाला. या बैठकीत देशभरात शाखांचा विस्तार करण्याविषयी चर्चा होणार आहे. तसेच संघाकडून विजयादशमी २०२५ ते २०२६ पर्यंत शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.