ST Bus Saam Tv
महाराष्ट्र

ST Ticket Price: पूरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा! १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द, सरकारचा मोठा निर्णय

ST Bus: सरकारने पूरग्रस्त महाराष्ट्राला मोठा दिलासा दिला. राज्य परिवहन महामंडळाने १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना भाडेवाढीचा निर्णय मागे घेण्याचे आदेश दिले.

Priya More

Summary -

  • महाराष्ट्र सरकारने १० टक्के एसटी भाडेवाढ रद्द केली.

  • भाडेवाढ रद्द करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर भाडेवाढ रद्द झाली.

  • दिवाळी काळात प्रवाशांवरील आर्थिक ताण कमी झाला आहे.

राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने मंगळवारी १० टक्के भाडेवाढ करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. या हंगामी भाडेवाढीमुळे नागरिक नाराज झाले होते. त्यानंतर आता सरकारने या भाडेवाढीचा निर्णय मागे घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढ मागे घेण्यात यावे असे आदेश दिले आहेत.

परिवहन विभागाकडून पूरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा देण्यात आला आहे. दिवाळीसाठी करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीच्या १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एसटीच्या तिकिट दरात १० टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने एसटी भाडेवाढ रद्द करावी असे एकनाथ शिंदे यांनी सूचविले होते. त्यावर प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ रद्द करण्याचे एसटी प्रशासनाला आदेश दिले आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. सरकारने १० टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतल्यामुळे तिकीटाचे दर वाढले होते. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार होती. ज्याठिकाणी १०० रुपये प्रवासासाठी लागणार होते तिथे ११० रुपये तिकीटासाठी द्यावे लागणार होती.

दिवाळीनिमित्त लालपरीने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. ऐन सणासुदीच्या दिवसात एसटीची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. एक तर अतिवृष्टीमुळे राज्यातल्या ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. कुणाचे घर, कुणाच्या शेतीचे नुकसान झाले. तर अनेकांची जनावरे दगावली. या संकटातून सावरत नाही तोवर सरकारने एसटीची भाडेवाढ केली. ग्रामीण भागात प्रवासासाठी लालपरीलाच जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भाडेवाढीच्या निर्णयावर नाराजी होती. हे लक्षात घेता सरकारने भाडेवाढीचा निर्णय मागे घेतला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात १० टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा झटका, घरातून बंडखोरी

Puri Recipe: Oil Free पुऱ्या खा, 'ही' रेसिपी लगेचच करा नोट

Kisanrao Hundiwale Case: किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांना जन्मठेप

Maghi Ganpati 2026: माघी गणपती जयंती का साजरी करतात? जाणून घ्या पौराणिक कथा

Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT