Pune Metro: पुणे मेट्रोचा महत्वपूर्ण निर्णय, तिकीट तपासणीत मोठा बदल, वाचा नेमका काय?

Pune Metro Ticket: पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मेट्रोच्या तिकीट तपासणीत मोठा बदल करण्यात आला आहे. यापुढे तिकीट स्कॅन केल्यावरच मेट्रोचे स्वयंचलित गेट्स उघडणार आहे.
Pune Metro: पुणे मेट्रोचा महत्वपूर्ण निर्णय, तिकीट तपासणीत मोठा बदल, वाचा नेमका काय?
Pune MetroSaam Tv
Published On

Summary -

• पुणे मेट्रोमध्ये तिकीट तपासणीसाठी नवी प्रणाली लागू
• तिकीट स्कॅन केल्यावरच AFC गेट्स उघडणार
• विना तिकीट प्रवेशाला आळा बसणार
• प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि शिस्तीसाठी महत्त्वाचा निर्णय

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे मेट्रोने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तिकीट स्कॅन केल्यावरच मेट्रोचे स्वयंचलित गेट्स उघडणार आहे. पुणे मेट्रोने प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवरील तिकीट तपासणीत हा मोठा बदल केला आहे. आता मेट्रो स्थानकात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना असणारे गेट्स आधीपासून बंद असतील आणि तुम्ही तिकीट स्कॅन केल्यावरच ते उघडतील. हा बदल आजपासून अंमलात आणला जाणार आहे.

आतापर्यंत मेट्रोचे एटोमॅटिक फेअर कलेक्शन गेट्स नेहमी उघडे असायचे. तिकीट स्कॅन केल्यावर हिरवा दिवा लागायचा आणि प्रवाशांना आत जाता येत असे,पण तिकीट नसताना किंवा चुकीचे तिकीट असल्यास हे फ्लॅप गेट्स बंद होत असत. पण आता पुणे मेट्रोच्या स्थानकांतील हे AFC गेट्स नेहमी बंद राहतील. जेव्हा प्रवासी आपले तिकीट किंवा कार्ड मशीनवर स्कॅन करतील, तेव्हाच हे दरवाजे उघडतील आणि प्रवाशांना आत जाता येईल.

Pune Metro: पुणे मेट्रोचा महत्वपूर्ण निर्णय, तिकीट तपासणीत मोठा बदल, वाचा नेमका काय?
Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! २ तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत, हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार? तारीख आली समोर

नवीन प्रणाली पुढीलप्रमाणे काम करेल...

प्रवेशापूर्वी एएफसी गेटचे फ्लॅप्स (दरवाजे) नेहमी बंद स्थितीत असतील.

तिकीट स्कॅनिंग: प्रवाशाने क्यूआर कोड तिकीट, मेट्रो कार्ड किंवा व्हॉट्सॲप तिकीट स्कॅन केल्यानंतरच हे दरवाजे उघडतील.

प्रवेशानंतर प्रवासी गेटमधून बाहेर पडताच दरवाजे पुन्हा आपोआप बंद होतील.

विना तिकीट प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास दरवाजे उघडणार नाहीत.

Pune Metro: पुणे मेट्रोचा महत्वपूर्ण निर्णय, तिकीट तपासणीत मोठा बदल, वाचा नेमका काय?
Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! नवा मेट्रो मार्ग लवकरच होणार सुरू; कुठल्या भागातील वाहतूककोंडी फुटणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com