हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन लवकरच सुरू होणार
मार्च २०२६ मध्ये या मार्गावर मेट्रो धावणार
प्रवाशांचा २ तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण होणार
२.३ लाखांहून अधिक आयटी कर्मचाऱ्यांना मेट्रोचा थेट फायदा होणार
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होत त्यांचा प्रवास सुसाट आणि आरामदायी होणार आहे. पुणे मेट्रो लाईन- ३ म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. मार्च २०२६ मध्ये ही मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर पुणेकरांचा २ तासांचा प्रवास फक्त ३० मिनिटांत होणार आहे. यामुळे आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो लाईनच्या दोन यशस्वी चाचणी आधीच पूर्ण झाल्या आहेत. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहेत. या प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू आहे. मार्च २०२६ मध्ये ही मेट्रो धावण्याची शक्यता आहे. मेट्रोमुळे शिवाजीनगर थेट राजीव गांधी आयटी पार्कशी जोडले जाईल. त्यामुळे गर्दीच्या वेळी आणि वाहतूक कोंडीच्या वेळी प्रवाशांना मेट्रोचा उत्तम पर्याय राहिल. ८०० हून अधिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या २.२ लाखांहून अधिक व्यावसायिकांना या मेट्रोचा फायदा होईल.
या प्रकल्पामध्ये विद्यापीठ चौकात एक अद्वितीय तिहेरी-स्तरीय डिझाइन तयार केले गेले आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. यातील खालचा स्तर - स्थानिक वाहतुकीसाठी शहरातील रस्ते, मधला स्तर - वाहनांसाठी जलद गतीने जाणारा उड्डाणपूल, तर वरच्या स्तर - मेट्रो ट्रॅक असेल. या सेटअपमुळे मेट्रो लाईनला आधार देताना वाहतूक देखील सुरळीत होण्याची शक्यता आहे. या मेट्रो लाईनमध्ये २३ आधुनिक स्टेशन आणि १४ प्रगत ट्रेनसेट्स असतील जे ऑपरेशनसाठी सज्ज असतील.
पुण्यातल्या हिंजवडीमधील वाहतूक कोंडी हा गंभीर विषय झाला होता. वाहतूक कोंडीमुळे आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावर पोहचण्यास उशिर होतो. या वाहतूक कोंडीमुळे अनेक टेक कंपन्या स्थलांतरित होण्याच्या विचार करत होत्या. पण आता नवीन मेट्रो लाईनमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटणार आहे. त्याचसोबत पुण्यातील आयटी कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना तिथेच टिकवून ठेवण्यास मदत होईल. या मेट्रोमुळे आयटी कंपन्यांना स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.