Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३च्या तिकीटावरून नवा वाद; नावांवर आक्षेप घेत नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai Metro Line 3 Ticket Name Dispute : मुंबई मेट्रो मार्गिका ३च्या तिकीटांवरील स्टेशनच्या नावांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. पूर्ण नाव नोंदवण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३च्या तिकीटावरून नवा वाद; नावांवर आक्षेप घेत नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
Mumbai Metro Line 3 Ticket Name DisputeSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई मेट्रो मार्गिका ३ ही पूर्णपणे भूमिगत मेट्रो आहे

  • तिकीटावरील नावांवरून वाद निर्माण

  • जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठानकडून अधिकृत पत्र

  • मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबईच्या लोकल प्रमाणे आता मुंबई मेट्रो देखील प्रवाशांसाठी महत्त्वाचं वाहन झालं आहे. लोकलच्या गर्दीतून आणि वेळ वाचवण्यासाठी प्रवासी मेट्रो मार्गिकेचा पर्याय अवलंबतात. काही महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मेट्रो मार्गिका ३ म्हणजेच एक्वा लाईन हा महायुती सरकारचा अतिशय महत्त्वकांक्षी असा हा प्रकल्प आहे. या मेट्रो मार्गिकेच्या दोन प्रमुख आणि महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवर देण्यात येणाऱ्या तिकीटांवर जे नाव नोंदवले जाते त्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

मेट्रो मार्गिका ३ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकीटावर मेट्रो स्थानकांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो टर्मिनस ऐवजी सीएसएम टर्मिनस मेट्रो असं करण्यात आलं आहे. तर जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकाचे नाव तिकीटावर जेएसएम टर्मिनस मेट्रो असे करण्यात येत आहे. दरम्यान या दोन्ही मेट्रो स्थानकांना देण्यात आलेल्या नावांचा पूर्ण उल्लेख तिकीटावर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३च्या तिकीटावरून नवा वाद; नावांवर आक्षेप घेत नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
Shocking : स्टॅमिनाच्या गोळ्या खायचा, रात्री अगणित छळ करायचा... वैतागलेल्या बायकोनं नवऱ्यासोबत असं काही केलं की हादरून जाल!

अशातच आता जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठानकडून मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून याबाबतची मागणी करण्यात आली आहे. पुढील एका महिन्यात तिकीटावरील नावात सुधारणा करण्यात आली नाही तर, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

Mumbai Metro Line 3 : मुंबई मेट्रो ३च्या तिकीटावरून नवा वाद; नावांवर आक्षेप घेत नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
Shocking : शाळेतून घरी आला अन् गळफास घेतला, चौथीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण उघड

मेट्रो मार्गिका ३ ही पूर्णपणे भूमिगत आहे. विशेष म्हणजे हा मेट्रो मार्ग तब्बल ३३.५ किमी लांब असून कुलाबा-वांद्रे-सीप्जला जोडणारा हा मार्ग आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा खूप सोयिस्कर मार्ग असल्याचं म्हटलं जातं. या मार्गावर तब्बल २६ भूमिगत मेट्रो स्टेशन आहेत. विशेष म्हणजे मिठी नदीच्या खालून जाणारी ही दुसरी मेट्रो मार्गिका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com