Shocking : शाळेतून घरी आला अन् गळफास घेतला, चौथीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण उघड

Gadchiroli Crime News : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात चौथीत शिकणाऱ्या १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
Shocking : शाळेतून घरी आला अन् गळफास घेतला, चौथीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण उघड
Gadchiroli Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • आरमोरी तालुक्यात १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

  • घटनेच्या वेळी मुलगा घरी एकटाच होता

  • आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनानेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मुलाच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. मृत मुलाचे नाव संस्कार विनोद कन्नाके आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संस्कारचे आई-वडील पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात मिरची तोडण्याकरिता गेलेले आहेत. घरी कोणीही नसल्याने संस्कार एकटाच घरी होता. रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास १० वर्षीय संस्कारने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

Shocking : शाळेतून घरी आला अन् गळफास घेतला, चौथीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण उघड
Buldhana : धक्कादायक! एकाच कुटुंबातील ३ जण, अन् २४ तासांत शहरातून ७ जण संशयास्पदरित्या बेपत्ता; नेमकं काय प्रकरण?

शाळेतून घरी परतल्यानंतर तो शांत शांत होता. तो कोणत्यातरी विचारात होता. मात्र कोणत्या हे अद्यापही समोर आलेले नाही. शाळेतून घरी आल्यानंतरच संस्काराने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. एका शांत, निरागस बालकाचा देह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून संस्कारांच्या आईने हंबरडा फोडला. या घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल.

Shocking : शाळेतून घरी आला अन् गळफास घेतला, चौथीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण उघड
Shocking : स्टॅमिनाच्या गोळ्या खायचा, रात्री अगणित छळ करायचा... वैतागलेल्या बायकोनं नवऱ्यासोबत असं काही केलं की हादरून जाल!

पोटच्या मुलाला लटकलेल्या अवस्थेत पाहून संस्कारांच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. शिवाय गावकऱ्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. मात्र या मुलाने आत्महत्येला का कवटाळलं याचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com