Buldhana : धक्कादायक! एकाच कुटुंबातील ३ जण, अन् २४ तासांत शहरातून ७ जण संशयास्पदरित्या बेपत्ता; नेमकं काय प्रकरण?

Buldhana Malkapur Crime News : बुलढाण्यातील मलकापूर शहरातून उच्चभ्रू कुटुंबातील आई आणि दोन मुले रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान शहरातील आणखी काही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
Buldhana : धक्कादायक! एकाच कुटुंबातील ३ जण, अन् २४ तासांत शहरातून ७ जण संशयास्पदरित्या बेपत्ता; नेमकं काय प्रकरण?
Buldhana Malkapur Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • मलकापूर शहरातून उच्चभ्रू पटेल कुटुंबातील तीन जण बेपत्ता

  • बेपत्तांमध्ये ३२ वर्षीय आई व दोन लहान मुलांचा समावेश

  • एकाच दिवशी बुलढाणा जिल्ह्यात सात जण बेपत्ता

  • पोलिसांकडून शोधमोहीम वेगात सुरू

संजय जाधव, बुलढाणा

एकीकडे मुंबईसारख्या झगमगत्या शहरातून १२ लहान मुलं एकाच दिवशी अचानक बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच बुलढाणामधील मलकापूर शहरातून उच्चभ्रू परिवारातील तीन जण संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील ३२ वर्षीय आई, ११ वर्षीय मुलगी आणि ८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली असून हे तिघे कुठे बेपत्ता झाले याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे.

मलकापूर शहरातील हनुमान नगर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत पटेल कुटुंब राहतं. वसंत कुमार पटेल यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी मित्तल पटेल, मुलगी सिया पटेल व मुलगा देवांश पटेल हे बाजारपेठेत गेले होते. मात्र बराच वेळ होऊन देखील ते परत न आल्याने पटेल भयभीत झाले.

Buldhana : धक्कादायक! एकाच कुटुंबातील ३ जण, अन् २४ तासांत शहरातून ७ जण संशयास्पदरित्या बेपत्ता; नेमकं काय प्रकरण?
Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी तातडीने शोध कार्य सुरु केले आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून एकाच दिवसात पटेल परिवाराच्या सदस्यांसह एकूण सात जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांना विविध पोलीस स्थानकात प्राप्त झाल्या आहेत. अचानक बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com