Bihar Election 2025 : मोठी बातमी! महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्यावर बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी

Bihar Election 2025 Update : भाजपने बिहार निवडणुकीसाठी कंबर कसलीये. भाजपने महाराष्ट्रातील बड्या नेत्यावर बिहारच्या निवडणुकीची महत्वाची जबाबदारी दिली आहे.
BJP Political news
BjpSaam tv
Published On
Summary

बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता

भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवडणुकीचे प्रमुख प्रभारीपद

महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती

बिहार राज्यच नव्हे तर पुढील वर्षी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिप्लब कुमार देब यांना सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

BJP Political news
Marathwada Flood : मदतीच्या किटवर जाहिरातीबाजी, ठाकरेंचा शिलेदार पेटला; सत्ताधाऱ्यांवर केली जळजळीत टीका

भाजपने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी बैजयंत पांडा यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजप नेते, केंद्रीय मंत्री मुरलीधार मोहोळ यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

BJP Political news
Nandurbar Adivasi Morcha : नंदूरबार का पेटलं? आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; १४० हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्र जारी केलं. त्यांनी तिन्ही राज्याच्या निवडणुकीसाठी प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती केली आहे. तर आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रभारी म्हणून नेमणूक केली. तर सीआर पाटील आणि केशव मौर्य यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

BJP Political news
Mumbai Crime : मुंबईत दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या; परिसरात खळबळ

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

मुरलीधर मोहोळ यांचा नगरसेवक, महापौर ते केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास राहिला आहे. मोहोळ यांची खासदारकीची पहिली टर्म आहे. त्यांची मोदी सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com