Mumbai Crime : मुंबईत दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या; परिसरात खळबळ

Mumbai Crime news : मुंबईच्या अंधेरीत दुहेरी हत्याकांड झालं. निर्दयी मुलाने वडील आणि आजोबाची हत्या केली. या घटनेने अंधेरीत खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime update
Mumbai Crime Saam tv
Published On
Summary

अंधेरीत तरुणाने केली वडील आणि आजोबाची हत्या

या हल्ल्यात तरुणाचा काका गंभीर जखमी

कुटुंबातील सततच्या दारू सेवन आणि शिवीगाळीमुळे तरुणाचा रागाच्या भरात हल्ला

पोलिसांकडून आरोपीला अटक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या अंधेरीत संतापजनक घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी (पूर्व) भागातील संतोषीमाता चाळीत मुलाने वडील आणि आजोबाची हत्या केल्याची घटना घडली आहे. तर मुलाने काकाला हल्ला करून जखमी केलं आहे. या दुहेरी हत्याकांडाने अंधेरीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी (पूर्व) येथील संतोषीमाता चाळीतील चेतन मनोज भात्रे (२३) या तरुणाने वडील, आजोबा आणि काकांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात वडील मनोज बाबू भात्रे (५७) आणि आजोबा बाबू देव्या भात्रे (७९) यांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai Crime update
S. L. Bhyrappa Death : सुप्रसिद्ध लेखकाचं बेंगळुरुत निधन; हृदयरोगाशी झुंज ठरली अपयशी

या हल्ल्यात काका अनिल बाबू भात्रे (५४) गंभीर जखमी असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Mumbai Crime update
Ladakh Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण; भाजप कार्यालय पेटवलं, कुठे घडली घटना?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आरोपीचे आजोबा वडील आणि काका हे दारू पीत प्यायचे. दारू प्यायल्यानंतर आरोपीला मारहाण शिवीगाळ करत करायचे. काल रात्री देखील दारू पिऊन आल्यानंतर त्यांनी चेतनला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर चेतनने धारदार शस्त्राने वडील, आजोबा आणि काकावर हल्ला केला.

Mumbai Crime update
Bank Holidays List 2025: देशभरातील बँकांना आठवडाभरात बंपर सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

तरुणाच्या जीवघेण्या हल्ल्यात वडील आणि आजोबांचा मृत्यू झाला. तर काकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून कुटुंबामध्ये वादविवाद सुरु होते. वडील आणि आजोबांच्या दारू पिणे आणि सततच्या शिवीगाळीला कंटाळून आरोपीची आई देखील घर सोडून गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com