Bank Holidays List 2025: देशभरातील बँकांना आठवडाभरात बंपर सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bank Holidays List 2025 update : देशभरातील बँकांना पुढील आठवड्यात बंपर सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना महत्वाची काम नियोजन करून पूर्ण करावी लागणार आहेत.
Bank Holidays
Bank HolidaysSaam Tv
Published On

Bank Holidays List 2025: सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत देशभरातील बँकांना बंपर सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची मोठी शक्यता आहे. यासाठी ग्राहकांनी चेक क्लिअरिंग, रोख व्यवहार, पैसे जमा करणे आणि इतर महत्त्वाची बँकिंग कामे योग्य नियोजन करून आधीच पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा या सुट्ट्यांमुळे ग्राहकांची बँकांची कामे रखडण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिन्याच्या या आठवड्यातील २२ सप्टेंबर रोजी अनेक भागातील बँका बंद होत्या. राजस्थानच्या जयपूरमध्ये बँका या घट स्थापनेच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या. तर तेलंगणामध्ये पुष्प उत्सव, बथुकम्माच्या निमित्त बँकांना सुट्टी होत्या.

मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये महाराजा हरि सिंह यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद होत्या. हरियाणामध्ये स्थानिक वीरांच्या स्मृतीदिनानिमित्त शहीद दिनानिमित्त बँका बंद होत्या.

Bank Holidays
Ahilyangar Flood : लेकासाठी बाप निसर्गाशी लढला; पुरातूनही वाट काढत दवाखाना गाठला

आरबीआयच्या आदेशानुसार, देशभरातील बँक २७ सप्टेंबर रोजी बंद असणार आहे. महिन्यातील चौथा शनिवार असल्याने या बँका बंद असणार आहेत. तर २८ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत. रविवारच्या दिवशी देशभरातील बँक असणार आहेत.

सलग सुट्ट्यांमुळे बँकेत चेक जमा करणे, खात्यातून पैसे काढणे, कर्जासाठी अर्ज करणे या सेवेसाठी बँकेच्या शाखेत जाण्यासाठी आधीच नियोजन करावे लागेल. तसेच बँकांच्या सुट्ट्या पाहून ग्राहकांना नियोजन करावे लागेल.

ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्याविषयी चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही युपीआय, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एटीएमच्या माध्यमातून पैसे काढू शकता. त्यामुळे पैसे काढणे आणि पैसे पाठवणे या सारख्या सेवेचा लाभ तुम्हाला घेता येईल.

बंपर सुट्ट्यांमुळे चेक क्लिअर करणे, कर्जाची प्रक्रिया किंवा अन्य बँकांची कामे लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे ग्राहक किंवा कंपन्यांनी बँकांशी संबंधित कामे आधीच करणे गरजेचे आहे.

Bank Holidays
Kalyan APMC Market : कल्याणमध्ये घोटाळ्याचा बाजार; समितीत आजी-माजी संचालकांच्या नातेवाईकांचा भरणा

बँकांच्या सुट्ट्या

22 सप्टेंबर – घट स्थापना (राजस्थान)

23 सप्टेंबर – महाराजा हरि सिंह जयंती (जम्मू-काश्मीर)

29 सप्टेंबर – महासप्तमी/दुर्गा पूजा (त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल राज्य)

30 सप्टेंबर – महाअष्टमी/दुर्गा अष्टमी/दुर्गा पूजा (त्रिपुरा, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मणिपूर, राजस्थान )न

Bank Holidays
Today Horoscope : नोकरीत प्रमोशन अन् व्यवसायात मिळणार यश; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

सलग सुट्ट्या -

त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगाल राज्यामध्ये २८ ते ३० सप्टेंबर महिन्यात सलग 3 दिवस बँका बंद राहणार आहेत.

28 सप्टेंबर – रविवार

29 सप्टेंबर – महासप्तमी

30 सप्टेंबर – महाअष्टमी/दुर्गा पूजा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com